navy. 
मुंबई

धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; एअरपोर्टवरुन झालं होतं अपहरण

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- पालघर जिल्ह्यात एका नौदलाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक  (Navi sailor burnt alive in Mumbai) प्रकार समोर आला आहे. गंभीर स्वरुपात जळालेल्या नौदल अधिकाऱ्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. मृत नौदल अधिकाऱ्याचे नाव सूरज कुमार आहे. त्यांची पोस्टिंग कोईबंतूर येथे होती. 

पालघरच्या जंगलामध्ये 5 फेब्रुवारीला सूरज यांना जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना याची सुचना दिली. सुरुवातीला सूरज यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या एनएस अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

शेतकरी आंदोलनाच्या भाजपला झळा

पालघर पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज यांनी सांगितलं होतं की एअरपोर्टवर त्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, पण अपहरणकर्त्यांना पैसे मिळणार नाहीत असं वाटल्याने त्यांना पालघरच्या जंगलामध्ये नेऊन जीवंत जाळण्यात आले. आरोपी फरार झाले आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अधिकाऱ्याचे नाव सूरज कुमार मिथिलेश दुबे आहे. ते झारखंडच्या रांचीचे रहिवाशी आहेत. 30 जानेवारीला सुट्टी संपल्यानंतर त्यांनी सकाळी 8 वाजता रांची येथून विमान पकडले आणि रात्री 9 वाजता चेन्नई एअरपोर्टवर उतरले. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर 3 अज्ञात लोकांनी बंदुक दाखवून त्यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिस्कावून पांढऱ्या रंगाच्या SUV मध्ये त्यांना बसवण्यात आलं. त्यांना 10 लाखांची खंडणी मागण्यात आली आणि त्यांना 3 दिवस चेन्नईमध्ये कैद करण्यात आलं. 

हायकोर्टाच्या जस्टीसनी केलं पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक; 'मोदी लोकप्रिय...

5 फेब्रुवारीला त्यांना पालघरच्या घोलपवड तहसीलच्या जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जंगलात जळलेल्या अवस्थेत ते खूप काळ तडपडत राहिले. त्यानंतर गावकऱ्यांना याचा पता लागताच त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, सूरज 90 टक्के भाजले होते आणि त्यांची स्थिती बिकट होती. घोलवड पोलिसांनी 302, 307, 364(a), 392, 342 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT