मुंबई

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार

सुमित बागुल

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास निवडणूक आयोगाने  प्रत्यक्ष कर विभागाला विनंती केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आलीये. स्वतः शरद पवार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यावर शरद पवार पवारांनी आपलं मत मांडलं आहे. "आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे", शरद पवार याबाबत बोलताना म्हणालेत. खरंतर नोटीस येणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र संपूर्ण संसदेत आम्हीच काही लोकं का निवडले जात आहोत, याबाबत विचार करायला हवा. हातामध्ये नोटिशीचा कागद आला की नेमकं काय ते समजेल, असंही शरद पवार म्हणालेत. 

काय आहे प्रकरण ? 

निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. आयकर विभागाने शरद पवारांकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे. 

सुप्रिया सुळेयांनाही येणार नोटीस ? 

स्वतः शरद पवारांनी याबाबत बोलताना सखासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार आहे असं समजलं असल्याचं सांगितलं. यावेळी पवारांनी टोला देखील लगावला. संपूर्ण देशात आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम असल्याचा टोला पवारांनी लगावला. 

आज दिवसभर अन्नत्याग करणार

शरद पवारांनी अभूतपूर्व गदारोळात नुकत्याच पास झालेल्या कृषी विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपणही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचं शरद पवार म्हणालेत. सोबतच राज्यसभेत गोंधळ घातल्यामुले आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या आठ खासदारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. त्यांना अनुमोदन म्हणून आज दिवसभर शरद पवार यांनीही अन्नत्याग केला आहे. 

NCP chief sharad pawar gets income tax notice with reference to his affidavits submitted to EC 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : सत्ता मिळाली, पण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार का? महायुतीसमोर खरी कसोटी सुरू!

Pune News: पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; महापौर, उपमहापौरांसह समिती अध्यक्षांसाठी महापालिकेकडून २८ वाहनांची खरेदी!

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : लातूरमध्ये बोहल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

SCROLL FOR NEXT