jitendra awhad.jpg 
मुंबई

Lockdown: आम्ही खायचं काय? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

'घरी बसा कोरोना होणार नाही'

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु आहे. येत्या एक मे रोजी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपेल. त्यानंतर आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो. मंत्रिमंडळाकडूनच लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले जात आहेत. या मुद्यावर राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं भाष्य केलं आहे.

लॉकडाउन वाढवणं का गरजेचं आहे? ते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. "आपल्याला मुंबईच उदहारण घेता येईल. लॉकडाउन लावल्यामुळे मागच्या १५ दिवसात तिथे परिस्थिती आटोक्यात आली. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. ग्रामीण भागात आपली आरोग्य व्यवस्था तितकी बळकट नाहीय, हे जितेंद्र आव्हाडांनी मान्य केलं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायाबद्दल विचारालं, तर लॉकडाउन करुन लसीकरण करणं हाच कोरोनावर मात करण्याचा मार्ग आहे" असे आव्हाड म्हणाले.

"लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय लोकांना पटत नाही. आम्ही खायचं काय? असा त्यांचा प्रश्न असतो. यावर मी एकच सांगीन की, जगाल तर जेवाल. जगावं लागेल. जनकर्तव्य नावाची एक गोष्ट आहे. सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी हे बरोबर वाही. जनतेने सहकार्य करावं. घरी बसा कोरोना होणार नाही. विषाणूची ताकत कमी होऊ द्या. आता आपण गर्दी केली. मास्क न घालत उभे राहिलो, तर घात होईल आपणच याला जबाबदार असू" असे आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Yogi Government : योगी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १५ लाख शिक्षकांसाठी ४४८ कोटींची मोफत आरोग्य कवच योजना

Agriculture News : जळगावात भाजीपाला स्वस्त, पण शेतकरी त्रस्त! उत्पादन खर्चही निघेना, बळीराजा पुन्हा संकटात

Latest Marathi News Live Update : भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

Ajit Pawar : आसमंतात झेपावणाऱ्या ज्वाळांना हात जोडत कार्यकर्त्यांनी दादांना दिला अखेरचा निरोप!

SCROLL FOR NEXT