मुंबई

"माझी सगळी संपत्ती पोरीच्या नावावर करा" - जितेंद्र आव्हाड

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात कोरोनाचा मोठा संसर्ग आहे. जग कोरोनाच्या दहशतीत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून कुणीही वाचलेलं नाही. अगदी समाजाच्या शेवटच्या माणसापासून डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी, सिने अभिनेते आणि अगदी राजकारण्यांना देखील कोरोनाची लागण झालीये. कोरोना कोण कसा आहे किंवा गरीब किंवा श्रीमंत आहे हे पाहत नाही हेच यावरून अधोरेखित झालंय.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना आधी ठाण्यातील ज्युपिटर आणि त्यानंतर मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. कोरोनाशी दोन हात केल्यांनतर आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती ठणठणीत आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. 

असं समजलं मला कोविड झालाय : 

जितेंद्र आव्हाड यांनी आपले कोरोनासंदर्भातील अनुभव मांडताना मोठा खुलासा केला. यामध्ये त्यांना स्वतः कोरोना झालाय हे माहीतच नव्हतं असं त्यांनी म्हटलंय. ठाण्यातील हॉस्पिटलमधून मुलुंडमध्ये हलवलं तेंव्हा मी बेशुद्ध होतो. आधीच्या ज्या टेस्ट झालेल्या त्यामध्ये माझा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला. त्यामुळे मला कोरोना झालाय हे मला ठाऊक नव्हतं.  मला हॉस्पिटलमध्ये जे जेवण दिलं जायचं त्यावर इंटेन्सिव्ह केअर युनिट-कोविड  आणि त्यापुढे माझं नाव असल्यामुळे मला कोविड झाल्याचं समजलं असं आव्हाड म्हणालेत.  

माझी सर्व प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करा 

याच मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना स्वतःला कोविड झाल्याचं समजताच त्यांच्या मनात पहिला विचार कोणता आला यावर देखील भाष्य केलं. सर्वात आधी मला माझ्या मुलीचाच विचार आला. जेंव्हा मला कोविड झालाय असं जेवणाच्या ताटावरून समजलं तेंव्हा सर्वात आधी मला मुलीचाच विचार डोक्यात आला. कोरोनामुळे अंगात खूप विकनेस होता, लिहिता येत नव्हतं, तेंव्हा मी तिथे एका कागदावर लिहिलं होतं की माझी जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती पोरीच्या नावावर करा. माणूस जेंव्हा ICU मध्ये एकटा असतो तेंव्हा त्याच्या मनात अभद्र विचार येतात असं देखील आव्हाड म्हणालेत.    

दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती चांगली असुन त्यांना घरी सोडण्यात आलंय.   

NCP minister jeetendra awhad write on paper to give his all property to his daughter natasha

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT