कल्याण-डोंबिवलीत रॅपिड टेस्टींग करण्यावर भर देण्याची गरज! - फडणवीस 
मुंबई

कल्याण-डोंबिवलीत रॅपिड टेस्टींग करण्यावर भर देण्याची गरज! - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी आरोग्य व्यवस्था विचारात घेऊन सरकारने या शहरांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. शहरात रॅपिड टेस्टींग करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह फडणवीस यांनी कल्याणमधील होली क्रॉस कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, पालिका गटनेते शैलेश धात्रक उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणुका कराव्यात, तसेच अधिकाधिक खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला आवश्यकतेनुसार रुग्णालयात अथवा उपचार विलगीकरण केंद्रात दाखल करण्यावर भर देण्याच्या सूचना फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.

डोंबिवलीकडे पाठ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत येणार नसल्याने समाजमाध्यमावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत 6500 कोटींच्या विकास प्रकल्पाचे काय झाले? असा प्रश्नही यावर विचारण्यात आला आहे. पत्री पूल, कोपर पूल बंद आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयाची स्थिती भयावह आहे, त्याला घाबरुन त्यांनी डोंबिवलीकडे पाठ फिरवल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT