लसीकरणात औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष; संघटनांचे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य विभागाला पत्र  
मुंबई

लसीकरणात औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष; संघटनांचे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य विभागाला पत्र

भाग्यश्री भुवड

मुंबई : आगामी तीन महिन्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस येण्याचा अंदाज असून, ती सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टर यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी सूची तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोना युद्धात पहिल्या फळीत काम करूनही लसीकरणाबाबत औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना औषध विक्रेता संघटनांनी व्यक्त केली आहे.


राज्यात 70 हजारहून अधिक औषध विक्रेते आहेत. लसीकरणात या औषध विक्रेत्यांना प्राधान्याने घ्यावे, अशी मागणी या संघटनांकडून होत आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या पहिल्या फळीत औषध विक्रेते मोडत असल्याने प्राथमिकता द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी राज्यातील औषध विक्रेता संघटना एकत्र आल्या आहेत. या लसीकरण सूचित त्यांचाही विचार व्हावा. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्य विभागाला पत्र लिहिले आहे. रुग्णाला प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यास तो औषध विक्रेत्याकडे धाव घेतो. त्याचा औषध विक्रेत्यांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे लसीकरणात त्यांचाही पहिल्या यादीत विचार करावा, असे औषध विक्रेता संघटनांचे म्हणणे आहे. 

औषध विक्रेता पीपीई किट घालून वावरत नाही. साधा मास्क घालून तो औषधे विक्री करतो. त्यामुळे तो विषाणूच्या संपर्कात येण्याची अधिक शक्‍यता असते. हजारो विक्रेते व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. औषध विक्रेत्यांचे घाऊक आणि किरकोळ विक्रेता असे दोन प्रकार असून, घाऊक विक्रेता नेहमीच किरकोळ विक्रेत्याच्या संपर्कात येतो; तर किरकोळ औषध विक्रेता शेकडो व्यक्तींच्या संपर्कात येतो. त्यामुळे दोन्ही औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट यांची देखील कोरोना लसीकरणात प्राधान्याने विचार व्हावा. 
- अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडनेशन संघटना.

------------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT