विरार : अर्नाळा पोलिसांनी नेपाळी टोळीच्या मुसक्‍या आवळल्या असून जप्त केलेले दागिने दाखवताना अधिकारी.  
मुंबई

दिवसा टेहळणी अन् रात्री घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : दिवस-रात्री टेहळणी करून घरफोडी करणाऱ्या सराईत नेपाळी टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. 

विरारच्या आगाशी परिसरातील दीपक ठाकूर यांच्या घरात २२ ते २३ जानेवारीला घरफोडी करून २ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीने दागिने घेऊन चोरटे फरार झाले होते. याबाबत अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करत पोलिसांनी या नेपाळी गॅंगचा भांडाफोड केला.

वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, उल्हासनगर, मुंबई परिसरात या टोळीवर अनेक घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे विरारच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका बगाडे यांनी सांगितले आहे. 

रोशन पदम शाही (वय २४), मानबहाद्दूर उपेंद्र ऊर्फ सहवीर सोनार, दीपक ऊर्फ राजू ऊर्फ रतन अमरबहाद्दूर शहा (साही), दीपक किरण थापा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना ठाणे रबाळे येथून अटक करण्यात आली. हे सर्व नेपाळचे आहेत. त्यांची मोठी टोळी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात कार्यरत आहे. 

विविध ठिकाणी गुन्हे दाखल
छोट्या-मोठ्या कामाचा बहाणा करून दिवस-रात्र टेहळणी करून, बंद घर हेरून त्या घराचे कडी-कोयंडा तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने घेऊन हे चोरटे फरारी होत होते. यांच्यावर अर्नाळा, ठाणे, उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाणे, वसई-माणिकपूर पोलिस ठाणे या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Update: MPSC कडून उत्तरपत्रिकेची नवी रचना जाहीर; जाणून घ्या काय बदलले आहे

Latest Marathi News Live Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून अचानक घेतली माघार; रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीनंतर 'या' कारणामुळे सोडली स्पर्धा

Mudkhed News : थरकाप उडवणारी घटना! आई-वडिलांचा घातपात; दोन्ही मुलांनीही संपविले जीवन

Tea: चहा आवडतो पण ॲसिडिटी होते? चहा बनवताना ‘ही’ एक गोष्ट नक्की टाळा

SCROLL FOR NEXT