corona 
मुंबई

सर्वात मोठी बातमी - मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत चीनलाही टाकलं मागे, रुग्णसंख्या झाली 85,326...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज 1201 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 85,326 झाली आहे. तर आज 39 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 4,935 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1269 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 


मुंबईत आज नोंदवल्या 39 मृत्यूंपैकी 32 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 23 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 22 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 15 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                          

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 762 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 59,181 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,269 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  57,152 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

                                      
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 67 टक्के इतका आहे. तर 5 जून पर्यंत एकूूूण 3,59,159 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 29 जून ते 5 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.60 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 44 दिवसांवर गेला आहे.

new 1201 corona patients in mumbai today 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT