corona 
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच; आज तब्बल 'इतके' नवे रुग्ण..जाणून घ्या आजची आकडेवारी 

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 1498 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 97,751 झाली आहे. तर आज 56 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,520 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 707 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

हेही वाचा: निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..
                                               
मुंबईत आज नोंद झालेल्या 56 मृत्यूंपैकी  39 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 41 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 31रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 20 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. 
                        
मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 800 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 67,478 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 707 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  68,537 रुग्णांना घरी सोडण्यात आले.         

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 70 टक्के इतका आहे. तर 15 जुलै पर्यंत एकूण 4,15,390 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 9 जुलै ते 15 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.33 इतका आहे. 

संपादन : अथर्व महांकाळ 

new 1498 corona patients in mumbai today 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT