पोलादपूर (बातमीदार) : प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंपूर्ण होण्यासाठी आगामी काळात कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण साने गुरुजी विद्यालयात सुरू करणार असल्याची घोषणा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रौप्य महोत्सव सोहळ्यात केली.
पोलादपूर तालुक्यात शैक्षणिक, कृषी, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहयोग प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव सोहळा नुकताच सानेगुरुजी विद्यालयात झाला. या वेळी आपल्या भाषणात विद्यालयाचे साने गुरुजी नाव ठेवण्यामागील उद्दीष्ट मुणगेकर यांनी स्पष्ट केले. १५० वर्षांच्या कालखंडात संत परंपरेत बसणारे साने गुरुजी हे व्यक्तिमत्त्व होऊन गेले म्हणूनच हे नाव या विद्यालयाला ठेवण्यात आले, असे मुणगेकर यांनी सांगितले. शिक्षकासंबंधित आपले विचार मांडताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी जीवनावर आपल्या विचाराचा प्रभाव शिक्षक करत असतात. देवळे गावचे सुपुत्र व सहयोगचे विनायक चित्रे यांनीही आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य करत आहेत, असे गौरवोद्गारही काढले.
ज्ञान मंदिरे ही पवित्र स्थान असून, अनेक सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम येथे होते. लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे अनेक करत असतो; मात्र या ज्ञान मंदिराला लागेल ती मदत करेल, असे आश्वासन देत आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मानधनातून एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
संस्थेने २५ वर्षे कार्यरत राहणे ही अवघड गोष्ट आहे; मात्र आपण हा खडतर प्रवास पार केलात, या शब्दांत संस्थेच्या कार्याचे कौतुक डॉ. मगरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यवाह काटाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन विजय दरेकर, सुभाष ढाणे यांनी केले. आभार चव्हाण यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे सर, अमर सलागरे, सुरेंद्र जाधव, मदन एकबोटे, विकास पाटणकर व सर्व सदस्य, मुख्याध्यापिका वालवंड व शिक्षकांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर, (माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ), तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भरतशेठ गोगावले, डॉ. व्ही. एन. मगरे, प्र. कुलगुरू एसएनडीटी मुंबई विद्यापीठ, गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे, कार्याध्यक्ष विनायक चित्रे, कार्यवाह दत्तात्रय काठाले, सरपंच किसन पारकर आणि सर्व विश्वस्त उपस्थित होते.
विद्यालयाच्या तिसऱ्या इमारतीचे उद्घाटन
सहयोग प्रतिष्ठानच्या या रौप्य महोत्सव वर्षाचे औचित्य साधून साने गुरुजी शाळेच्या तिसऱ्या इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामासाठी ज्या दानशूर व्यक्तीनी मदत केली त्या सर्वांचा या वेळी सत्कार करण्यात आला; याशिवाय विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला. या वेळी सहयोगच्या कार्याचा आढावा घेतलेली स्मरणिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अजूनही भारतात स्त्री-पुरुष समानता, सहिष्णुता या विषयात आपण मागे आहोत. मात्र, गेल्या ५० वर्षांत भारतीय स्त्रियांनी जी प्रगती केली, तेवढी जगात कोठेही झालेली नाही.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर, अध्यक्ष, सहयोग प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.