लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय! नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत 'बेस्ट' 
मुंबई

लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय! नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत 'बेस्ट'

शरद वागदरे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आलेले पर्यटनस्थळ शहरासह, उपनगरमधील नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासह जीवनातील महत्त्वाच्या क्षणांच्या आठवणी ठेवण्यासाठी छायाचित्रणासाठी काढण्यास तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. यासाठी नेरूळमधील पाम बीच रस्त्यालगत असणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क, वंडर पार्क; त्याचप्रमाणे वाशी येथील सागर विहार, पारसिक हिल हे नवी मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे आणि लग्न म्हणजे फोटो हे समीकरणच. आता लग्नाआधी नवरा-नवरीचे फोटो काढण्यास मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे जशी कुवत असेल, त्याप्रमाणे हे लग्नापूर्वीचे छायाचित्रण केले जाते. या छायाचित्रणासाठी ठिकाण हा महत्त्वाचा भाग असतो. नवी मुंबईत छायाचित्रणासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. पाम बीच मार्ग, नेरूळ तलाव, ज्वेल ऑफ नवी मुंबईसारखी ठिकाणे आहेत. मात्र, या छायाचित्रणासाठी वंडर पार्कसारखे एकाच ठिकाणी वैविध्य असलेले ठिकाण मिळत नाही. त्यामुळेच लग्नाआधीच्या छायाचित्रणासाठी सध्या या पार्कमध्ये अनेक जोडपी येताना दिसतात. त्याचप्रमाणे प्रसूतीपुर्वीच्या छायाचित्रणासाठी देखील पसंती वाढत चालल्यामुळे शहरातील या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत येते. 

वंडर पार्कमधील ताजमहालाची प्रतिकृती, मिनी ट्रेन, बुद्धिबळाच्या खेळातील सोंगट्या, स्ट्रॉबेरी, तलाव, तलावावरील पूल, कारंजे, प्रशस्त उद्यान, झाडांची एक रांग या सर्व गोष्टी छायाचित्रणासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्याचबरोबर सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तावेळी येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून, छायाचित्रकाराला हवे तसे फोटो काढता येतात. काहींना उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपल्या प्रेमाची शपथ घ्यायची असते; तर काहींना तलावात पाय सोडून बसायचे असते. त्यामुळे हवा तितका वेळ आणि कोणाच्याही अडथळ्याशिवाय येथे छायाचित्रण करता येते. त्यामुळे लग्नापूर्वीच्या छायाचित्रणासाठी पहिली पसंती वंडर पार्क ठरत आहे. त्याचप्रमाणे सागर विहारच्या ठिकाणी असणारा खाडीकिनारा व वाशी येथील उड्डाणपूल दिसत असल्यामुळे येथे छायाचित्रण केले जाते. ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी थिंकर आणि डायमंडच्या प्रतिकृतीमुळे या ठिकाणी छायाचित्रण करणाऱ्यांची रीघ लागते. समाजमाध्यमांवर इंस्ट्राग्रॉम, फेसबुक, व्हॉटसऍपवर विविध हावभावांमध्ये छायाचित्र काढून, पोस्ट करण्यासाठी नवी मुंबईतील सौंदर्याने नटलेल्या उद्यानांचा वापर करण्यात येतो. 

वंडर्स पार्ककडे नागरिकांचा ओढा 
वंडर्स पार्कमध्ये राईडसचा आनंद घेण्यासाठी केवळ नवी मुंबईतीलच नाही; तर मुंबई, ठाणे आणि पनवेल-उरणमधील लोकही हजेरी लावतात. त्यामुळे वंडर्स पार्कमध्ये नेहमीच लोकांची गर्दी असते. या पार्कमध्ये असणारे निसर्गसौंदर्य, सात जागितक आश्‍चर्यांच्या प्रतिकृती, या ठिकाणची रचना, चारही बाजूंनी येणारा सूर्यप्रकाश या जमेच्या बाजू लक्षात घेऊन, प्रसूतीपूर्व व लग्नापूर्वीच्या छायाचित्रणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

नवी मुंबईतील उद्यानांमध्ये लग्नापूर्वीचे छायाचित्रण व चित्रीकरण करत असल्यास त्यांच्याकडून शुल्क घ्यायचे का नाही, या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. तरी वंडर्स पार्कमध्ये येणाऱ्या व्यक्तीकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येते. अन्य ठिकाणच्या उद्यानामध्येदेखील प्रवेश शुल्क आकारण्यात येण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. 
- नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग. 

लग्नाचा हंगाम सुरू झाल्यामुळे लग्नाअगोदरच्या छायाचित्रणास पसंती वाढत चालली आहे. नवी मुंबई शहरांमध्ये अनेक चांगली उद्याने; तसेच सुशोभीकरण केलेल्या वास्तू असल्यामुळे त्या ठिकाणची निवड केली जाते. शहरामधून बाहेर जाण्यापेक्षा जवळच चांगल्या वास्तू असल्यामुळे कमी खर्चामध्ये निसर्गसौंदर्याचा लाभ घेता येतो. 
- चेतन सांवत, छायाचित्रकार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT