Mumbai Sakal
मुंबई

मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सकाळ माध्यम समुहाकडून गौरव

स्वातंत्र्यपूर्वकाळापासून वृत्तपत्र‍ विक्रेत्याचे कार्य करणाऱ्या पिढीचा 'सकाळ' समुहातर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत वृत्तपत्रविक्रेत्याचा वारसा चालविणाऱ्या दुस-या आणि तिसऱ्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेत्यांचा आज उद्योग मंत्री व बृहन्मुंबई वृत्तपत्र विकेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

१५ ऑक्टोबर या जागतिक वृतपत्रविक्रेता दिन आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ'समुहाने या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले हेाते. यावेळी देसाई यांच्यासह सकाळचे मुख्य वितरक बाजीराव दांगट, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष हरी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विकेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, विश्वस्त संजय चौकेकर, विश्वस्त जीवन भोसले, युवा उद्योजक स्वाद कॅटरिंग सर्व्हिस आणि दक्षिण मुंबईचे अध्यक्ष नितीन कोलगे, आदींचा आदी उपस्थित हेाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सकाळचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक दिनकर‍ कोकितकर यांनी केले. तर सूत्रसंचालन बुहंमुंबई वृत्तपत्र संघटनेचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी केले.

यावेळी देसाई म्हणाले की, हा सत्कार हा निष्ठेने मागील चार पिढ्यापासून केलेल्या कामाचा सत्कार आहे.आपण आपल्या सेवेत सातत्य दिले, आपल्या आपण सातत्त्याने काम करत राहातवे योग्य वेळी आपल्या कामाची दखली घेतली जाईल.हा कुठल्या एका कंपनीचा व्यवसाय नाही, सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, एकदिलाने काम केले पाहिजे. आपण जनतेला माहिती, ज्ञान पोचविण्याचे मोठे काम करत आहात, आपले हे काम सुरळीत राहावे अशी मी प्रार्थना करतो.

यावेळी आपले अनुभव सांगताना देसाई म्हणाले की, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला विक्रेत्यांसाठी काम करण्यास सांगितले. पुढे मी विक्रेता, मुद्रक, प्रकाशक झालो. आता ३२ वर्षे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यावर फेरीवाल्यांप्रमाणे कारवाई केली जात होती, त्यांचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यावेळी मला बाळासाहेबांनी यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी सांगितले हेाते. त्यावेळी हे वृत्तपत्र विक्रेते हे फेरीवाले नाहीत, असे असे सांगून त्यांना संरक्षण देण्याचे काम झाले. त्यामुळेच तुमची एकजूट असल्याने तुमचे प्रश्न सोडवू शकतो. आणि तुमच्या कामाचीही कंपन्या बूज राखतात असेही देसाई म्हणाले.

हे आहेत सन्मानित सत्कारमुर्ती

यावेळी मुंबई आणि परिसरातील वृत्तपत्र विक्रेते रोहीत मोरे, विजय मोरे, अजित सहस्त्रबुद्धे, सिद्धेश बने, सुनील मराठे, विजय कोठावदे, रामदास सावर्डेकर, वेंकटेश्वरन कोणार, अजय विचारे, सुहास पाडावे, मंगला वाणी, शांताराम चौकेकर, पांडुरंग मराठे, शशी शिर्के यांचा सकाळचे सन्मानचिन्ह देऊन देसाई च्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT