dahanu ndrf.
dahanu ndrf. 
मुंबई

पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

सकाळवृत्तसेवा

डहाणू (वार्ताहर) : अरबी समुद्रात घोंघावणारे 'निसर्ग' चक्रीवादळ 3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर धडकणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईसह इतर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच पुढील 12 ते 24 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. हे चक्रीवादळ 3 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून जाणार आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरिल रायगड, हरिहरेश्वर आणि दमणमधून जाणार आहे. या वादळाचा धोका डहाणू तालुक्यासह पालघर, रत्नागिरी व मुंबईला असल्याचे वर्तविण्यात येते.

डहाणू तालुक्यातील किनाऱ्यावरील सतीपाडा, दिवादांडी, मांगेलवाडा, आगर, नरपड, धाकटी डहाणू, तडीयाले, गुंगवाडा, घोलवड, बोर्डी आदी भागांतील नागरिकांना सुरक्षितता म्हणून प्रशासनाने के एल पोंदा हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, दोन सभागृहात हलविण्यात आले आहे. याच भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर वादळ पूर्वस्थिती निर्माण होत असून, दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरीप सुरू आहे. पुढील 12 तासांत वादळी वारे सुमारे 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने घोंघावतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या डहाणूत तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय नौसेना, तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांनी उद्या दुपारच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचे भाकीत केले आहे. 

कारखाने, दुकाने आज बंद
पालघर जिल्ह्यातील सर्व कारखाने, दुकाने, इतर आस्थापना विभाग उद्या बंद करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. डहाणू व वसईत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहे. 3 जूनला वादळाच्या प्रभावाने मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. समुद्रकिनाऱ्यावर कुणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT