मुंबई

'निसर्ग' आलं आणि सगळं उध्वस्त करून गेला, लॉकडाऊनमधले संसार आता थेट उघड्यावर...

सकाळवृत्तसेवा

महाड : महाड शहर व ग्रामीण भागाला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. या वादळामुळे सुमारे 1200 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळानंतर खंडीत झालेल्या वीजपुरवठयामुळे महाडकरांनी रात्र जागून काढली. तर सकाळी पाण्यासाठी अनेकांना धावपळ करावी लागली.

महाड तालुक्यातील 316 गावे वादळाच्या तडाख्यात सापडली. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने अनेकांच्या घरांची छपरे उडून गेली आहेत. अनेकांच्या घरातील सामान भिजल्याने मोठे नुकसान झाले. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. गोठे कोसळल्याने पशुधन वाऱ्यावर पडले आहे. वादळामुळे विजेचे खांब कोलमडले आहेत. 

रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडंच झाडं 

मुंबई-गोवा महामार्ग, महाड म्हाप्रळ-मार्ग पुणे रस्ता, रायगड रस्ता या सर्व रस्त्यांवर असणारी अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली. महाड शहराजवळील पीजी सिटी व लाखपाले गावाजवळ मोठे झाड रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रायगड खोर्‍यातील पाचाड रायगड वाडी, नेवाळे वाडी, हिरकणी वाडी तसेच खाडी पहा भागांमध्ये वादळाने मोठ्या प्रमाणात तडाखा दिला. खैरे सोनघर आदिवासी वाडीमध्ये अनेकांची घरकुले कोसळली. यामध्ये काही आदिवासी जखमी झाले.

बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बहुसंख्य गावांमध्ये आंबा, काजूची झाडे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ववत झाला. त्यामुळे महानगरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

पाणीपुरवठा सुरळीत पण वीजपुरवठा नाही 

महाड शहरांमध्ये सकाळी नगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असला तरीही वीजपुरवठा नसल्याने इमारतींमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना इमातीच्या   मजल्यांवर दमछाक करत पाणी भरावे लागले. वीजपुरवठयाअभावी व वादळामुळे सर्व कंपन्यांची इंटरनेट सेवा तसेच नेटवर्क पूर्णपूणे कोलमडल्याने संपर्क साधणे ही अवघड झाले होते. ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा नसल्याने ग्रामस्थांना पाण्याविना हाल झाले.

पंचनामा करण्याचे काम सुरू

महाडमध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर निश्चित आकडेवारी समजू शकेल, अशी माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.

nisarga cyclone destroys raigad read devastating report of mahad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT