औषध व आर्थिक अपहारप्रकरणी भिवंडी पालिकेकडून कारवाई नाहीच; शिवसेना नगरसेवक संतप्त 
मुंबई

औषध व आर्थिक अपहारप्रकरणी भिवंडी पालिकेकडून कारवाई नाहीच; शिवसेना नगरसेवक संतप्त

शरद भसाळे

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील औषध व आर्थिक अपहारप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांमार्फत गोपनीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालानुसार तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर आयुक्त प्रशासनाने तातडीने कारवाई करून सरकारला अहवाल सादर करावा, असे गोपनीय पत्र नुकतेच राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना पाठविले. मात्र राजकीय दबावामुळे आयुक्त कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे माजी महापौरांसह, नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी या बाबतीत सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

भिवंडी पालिकेच्या आरोग्य केंद्रातील 2015-16 पासून 2018-19 पर्यंतच्या औषध पुरवठ्याबाबत सरकारकडून आलेल्या औषधांची नोंदवही व अनेक महत्वाचे दस्ताऐवज गहाळ करून आर्थिक अपहार केल्याची तक्रार शिवसेना व भाजप नरसेवकांनी महापौर यांच्याकडे केली होती. तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी याबाबत दखल घेत सरकारकडे तक्रार केली होती. या बाबत सरकारने पालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांना या प्रकरणी गोपनीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आयुक्त हिरे यांनी पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. जाधव यांनी या प्रकरणी सखोल गोपणीय चौकशी करून सुनावणी घेतली असता, डॉ.शेट्टी यांच्याकडून काही औषधे व दस्ताऐवज आगीमध्ये जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत डॉ.शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. तसेच याप्रकरणी त्यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचारी समाधान कारक उत्तर देऊ शकलेले नाहीत. याबाबत जाधव यांनी याबाबतचा चौकशी तपास अहवाल तयार करून, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठवला. या अहवालाची पडताळणी करून राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांनी आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना लेखी पत्र पाठवून अपहारप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शेट्टीवर कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

पालिका आयुक्त डॉ. आशिया यांच्यावर राजकीय दबाव आल्याने गेल्या दिड महिन्यापासून सरकारी आदेश गुंडाळून ठेवण्यात आला आहे. पालिका प्रशासनाकडून औषध व आर्थिक अपहारप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे व नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत सखोलपणे चौकशी करून कारवाई करावी. 
- जावेद दळवी, माजी महापौर 

डॉ. विद्या शेट्टी यांच्यावर कारवाई करावी. याबाबत सरकारकडून पत्र आले असून, या बाबतीत लवकरच चौकशी करून कारवाई केली जाईल. 
- डॉ.पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी महापालिका 


-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

Winter Health Tip: हिवाळ्यात दररोज गाजराचा रस प्यायल्याने काय होते? वाचा एका क्लिकवर

Nashik Crime : अटक वॉरंट चावून खाण्याचा प्रयत्न, चिमुकल्याला टेबलावर आपटण्याची धमकी! म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताच्या पत्नीचा धिंगाणा

Dhurandhar Bade Sahab : धुरंधर चित्रपटातील 'बडे साहब' कोण? आदित्य धर स्वतःच म्हणाले ती व्यक्ती म्हणजे...

Latest Marathi News Live Update: पेणमधील स्ट्राँगरूममध्ये उंदरांचा शिरकाव, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल

SCROLL FOR NEXT