alcohol 
मुंबई

तळीरामांचा घसा कोरडाच राहणार! लॉकडाऊननंतरही मद्य विक्री नाहीच

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात लॉकडाऊच्या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी तळीरामांनी मद्याची दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. अवैध मद्यविक्रीला ऊत आला असून, लॉकडाऊनच्या 22 दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुमारे 924 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. परंतु, मद्यविक्री सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. अनेक मद्यपींनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी समाज माध्यमांवरून केली आहे. त्याचा गैरफायदा अवैध मद्यविक्रेते घेत आहेत. राज्यात 24 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत अवैध मद्यविक्रीचे 2593 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दररोज सुमारे 42 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. 

पंजाब, केरळ या राज्यांमधील सरकार मद्यविक्री काही प्रमाणात सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मद्य उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, मद्यपींची गर्दी झाल्यास कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 3 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतरही लगेच मद्य विक्री सुरू होणार नसल्याचे समजते. 

मद्याचे उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या तरी मद्यविक्री सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. 
- दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री 

संपूर्ण राज्यातील मद्यविक्रीसंदर्भात निर्णय होईल, कुठल्या एका जिल्ह्यासंदर्भात विचार केला जाणार नाही. मद्यविक्री सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 
- कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT