corona
corona 
मुंबई

मुंबईतील रुग्णसंख्येचा आलेख वाढताच; दिवसभरात 15 जणांचा मृ्त्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. सोमवारी तब्बल 395 नवे रुग्ण आढळले. आणखी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 219 झाली आहे. हे रुग्ण वरळी, धारावी, कुर्ला आणि अंधेरी परिसरातील असल्याचे समजते. मुंबईत 395 नवे कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 5589 वर पोहोचली. 

सोमवारी 288 नवे रुग्ण आढळले, तर 107 रुग्ण 22 व 23 एप्रिलला दाखल झाले होते. मृतांपैकी 10 जणांना दीर्घकालीन आजार होते, तर पाच रुग्णांच्या मृत्यूचे कारण वार्धक्याशी संबंधित आहे. मृतांमध्ये 8 पुरुष व 7 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी तिघे 40 वर्षांखालील, चौघे 60 वर्षांवरील आणी उर्वरित 8 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईतील कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा 219 झाला आहे. एकूण 433 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 8724 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. 

118 जण कोरोनामुक्त
कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या व्यक्तींचीही संख्या वाढत आहे. सोमवारी 118 जणांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 100 रुग्ण मुंबईबाहेरून उपचारांसाठी आले होते.आतापर्यंत 1015 रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत.  

1000 खाटांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था
महापालिकेने गोरेगाव येथील नेस्को मैदानावर 1200 खाटांचे कोरोना आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर) उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यांपैकी 1000 खाटांसाठी ऑक्सिजन देण्याची सुविधा असेल. त्यासाठी रोमेल ग्रुप व एमसीएचआय-क्रेडाई या संस्थांनी मदत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT