no entry 
मुंबई

दिवा-आगासन मार्गावर अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'

दीपक शेलार

ठाणे : कल्याण-शिळ मार्गावरदेखील खड्डे आणि रस्त्यांच्या कामांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहने आणि खासगी बसेस दिवा आगासन मार्गे मार्गक्रमण करत असल्याने दिवावासीयांच्या त्रासात भर पडली आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत ठाणे वाहतूक शाखेने दिवा आगासन मार्ग सोमवारपासून अवजड आणि खासगी कंपन्यांच्या बसेससाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. 

कल्याण-डोंबिवलीकरांसह मुंब्रावासीयांनाही शिळफाटा मार्गे ये-जा करावी लागते. याच एकमेव मार्गावरून अवजड वाहतूक देखील होत असल्याने वाहतुकीवर ताण येत आहे. त्यातच खड्ड्यांचे विघ्न आणि कल्याण-शिळ रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ही कोंडी टाळण्यासाठी वाहनचालक दिवा-आगासन या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत.

आधीच हा रस्ता अरुंद असून मलनि:सारण वाहिन्यांच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. तरीही अवजड वाहनांसह खासगी बसेस या मार्गे जाऊ लागल्याने कोंडीत भर पडली आहे. यामुळे संतप्त दिवावासीयांकडून याचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटू लागले आहेत. दरम्यान, शिळफाटा भागात राहणारे माजी आमदार सुभाष भोईर यांनीही वाहतूक शाखेस पत्र पाठवून हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची सूचना केली. त्यानुसार वाहतूक शाखेने सोमवारपासून या मार्गावरून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक आणि खासगी बसगाड्यांच्या वाहतुकीला नो एण्ट्री केली आहे. त्यामुळे या मार्गावरील कोंडी काहीअंशी फुटण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

no entry for heavy vehicles on diva agasan highway in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT