मुंबई

‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’; महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 17 : मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे.  अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेकडून मुंबईभरात अ‍ॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी ऑनलाईन शॉपिंग मध्ये अग्रेसर कंपन्यांना मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आग्रह धरला आहे. यासाठी त्यांनी वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर फलक आहे. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉनकडून यावर काय तोडगा काढण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. बीकेसी परिसरात कार्यालय असणाऱ्या या दोन्ही कंपन्याच्या प्रशासनाने मराठी भाषेचा पर्याय देणार असल्याचे सांगितले होते. आठवड्याभरात मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देण्याचा इशारा ही त्यावेळी मनसेने दिली होता.

मनसेच्या आग्रही मागणीची दखल अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत ही आले होते.

no marathi no amazon maharashtra navanirman sena aggressive against amazon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT