Nawab Malik
Nawab Malik File photo
मुंबई

'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही', राष्ट्रवादीची सूचक प्रतिक्रिया

दीनानाथ परब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "परमबीर सिंह यांच्या तक्रारीवरुन काही लोक कोर्टात गेले. स्वत: कमिशनर कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात कोर्टाला प्राथमिक चौकशीची माहिती दिली का? किंवा कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते का? याबद्दल आम्हाला माहित नाही" असे नवाब मलिक म्हणाले.

"कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. अनिल देशमुख तपासात सहकार्य करत होते. कुठल्याही तपास यंत्रणेला संशय असेल, तर ते चौकशी करु शकतात. छापेमारी करु शकतात. एफआयआर दाखल करु शकतात. पण ज्या पद्धतीने हे प्रकरण बनवलं गेलं. पहिल्यादिवसापासून हे प्रकरण राजकारणाने प्रेरित आहे" अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

"उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कारमध्ये स्फोटक सापडण्याचं हे प्रकरण होतं. पण सचिन वाझेने कुणाच्या सांगण्यावरुन हे सर्व केलं, त्याचा खुलासा NIA ने केलेला नाही. पोलीस आयुक्तांची काय भूमिका होती याची माहिती दिलेली नाही" असे नवाब मलिक म्हणाले.

"एकापोलीस आयुक्ताला हटवलं. हा आयुक्त मुंबईत पोलीस दलात अधिकाऱ्यांची टीम बनवून काम करत होता. त्यानंतर आयुक्तांनी पत्र लिहिल्यापासून जी कारवाई सुरु आहे, ती राजकारणाने प्रेरीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन सरकारला आणि माजी गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा खेळ सुरु आहे. पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आज नाही तर उद्या सत्य समोर येईल" असे नवाब मलिक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT