MUMBAI
MUMBAI 
मुंबई

बॉम्बची अफवाच! मंत्रालयात संशयास्पद वस्तू आढळली नाही

कार्तिक पुजारी

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणार फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणा लगेच सक्रिय होत फौजफाटा वाढवण्यात आला होता

मुंबई- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणा लगेच सक्रिय होत परिसरात फौजफाटा वाढवण्यात आला होता. बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने मंत्रालय परिसर आणि मंत्रालयात तपास सुरु करण्यात आला. यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालय किंवा आवारात कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (No suspicious object has been found search operation of Mantralaya premises Mumbai Police PRO )

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झालं. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञाताने फोन करुन बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून मंत्रालयातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराच हा फोन आला होता. रविवारची सुट्टी असल्याने कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नव्हते. बॉम्बशोधक पथकाने श्वानपथकाच्या मदतीने परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं होतं. सर्च ऑपरेशनदरम्यान कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नागपूर येथील सागर काशिनाथ मन्द्रे या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्या बाबत फोन केल्याची माहिती आहे. सागर काशिनाथ मन्द्रे हे वॉर्ड क्र 04, क्रांती चौक, बोरीनगर ,नागपूर ग्रामीण येथे रहायला आहेत. सागर काशिनाथ मन्द्रे यांनी यापूर्वी ही दि 12.02.2020 रोजी महसूल विभागाचे सचिव यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांचे काही अंशी मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे समजून येत आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून संम्पूर्ण मंत्रालय व परिसराची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. वरील प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे पुढील तपास करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT