मुंबई

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असणाऱ्या मुंबई मनपातील 84 CCTV पैकी एकही कॅमेरा सुरु नाही

समीर सुर्वे

मुंबई, ता.17 : मुंबई महानगर पालिकेच्या जुन्या इमारतीत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे कॅमरे बंद असल्याबाबत महानगर पालिका प्रशासनानेच कबुली दिली असून तशी माहिती स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

मुंबई महानगर पालिका मुख्यालय हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहीले आहे. 1992 ला महापालिकेच्या मुख्यालयातही बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट होता. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा हा नेमहीच महत्वाचा मुद्दा राहीला आहे. 9/11 च्या हल्ल्यांनंतर मुख्यालयाची सुरक्षा अधिक चोख करण्यात आली. प्रवेश द्वारांवर बॅग स्कॅनर बसवण्यात आले तर जुन्या आणि नव्या इमारतीत सीसीटीव्हीही लावण्यात आले.

77 लाख खर्च

हे सीसीटीव्ही चालू करुन त्यांची वार्षिक देखभाल ठेवण्यासाठी महानगर पालिकेने निवीदा मागवल्या होत्या. त्यात, सीसीटीव्ही सुरु करुन चार वर्ष त्यांची देखभाल करण्यासाठी पालिका 77 लाख 55 हजार रुपये खर्च करणार आहे. 

मात्र, 2016 मध्ये हमी कालावधी संपल्यानंतर हे सीसीटीव्ही सुरक्षा खात्याला हस्तांतरीत करण्यात आली. तेव्हापासून या सीसीटीव्हीची वार्षिक देखभाल झालेली नसल्याने काही काळाने ते बंद पडले आहेत. असे 84 सीसीटीव्ही अस्तीत्वात असून त्यातील एकही सीसीटीव्ही सुरु नाही.

सीसीटीव्ही बंद असल्याची कबुली प्रशासनानेच दिली आहे. सदयस्थीतीत सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. तसेच, वार्षिक देखभाल दुरुस्तीचा करार नसल्याने ती चालू करुन घेण्यात अडचणी येत आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीत मांडली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

not even single CCTV is working in bruhanmumbai municipal corporation security is at stake

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT