मुंबई

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियाविरोधात जारी होणार रेड कॉर्नरसाठी नोटीस? वाचा काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा



मुंबई : दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय(ईडी) लवकरच इंटरपोलकडे जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ व जुनैद यांच्यासह 13 जणांवर ईडीने डिसेंबर,2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीने बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यानंतर ही मालमत्ता पुनर्विकासासाठी विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात मिर्चीने बेकायदा खरेदी केलेल्या मालमत्तेचा लाभ त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याचा आरोप आहे.

ते या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी अनेकवेळा मिर्चीच्या कुटुंबियांना समन्स पाठवले होते. पण त्यानंतर ते हजर न झाल्यामुळे अखेर ईडीने मार्च महिन्यात मिर्ची कुटुंबियांविरोधात अजामिनपात्र वॉरट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच ईडीची ती मागणी न्यायालयाने मान्य केली होती.  
भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत.याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी 500 कोटींची मालमत्ता आहे.

कोण होता इक्बाल मिर्ची?

दाऊदचा विश्‍वासू असलेल्या मिर्चीला 1994 मध्ये तडीपार केलेहोते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तोसांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. 1995 साली तो भारतातूनविदेशात पळून गेला. 1988 पासून अंमली पदार्थांच्यातस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळायेथे मिरचीच्या कुटुंबियांचा मिर्ची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. अंमली पदार्थांच्या प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे.भारतातून परागंदा झाल्यानंतर मिर्चीने दुबईत आपलेसाम्राज्य निर्माण केले.14 ऑगस्ट, 2013 मध्ये मिर्चीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT