beds
beds 
मुंबई

मोठी बातमी! रुग्णांची बेडसाठी होणारी फरफट अखेर थांबणार;पालिका 'या' पद्धतीनं ठेवणार बेडची माहिती..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेने आपल्या रुग्णालयात रुग्णांची बेडसाठी होणारी फरफट थांबवण्यासाठी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक बेडला विशिष्ट ओळख क्रमांक (बारकोड) देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय बेडच्या संख्येबाबतची सर्व माहिती ऑनलाईन मिळणार असून यामुळे रुग्णांची बेडसाठी होणारी फरफट थांबणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते.

 महापालिका आयुक्तपदी इकबाल सिंग चहल आल्यापासून त्यांनी त्यांनी कोविड19 रुग्णांसाठी काही नवीन निर्णय घेतले आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णांना बेडची माहिती मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून रूग्णालयातील बेडसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या बेडची माहिती तेथे अपलोड होईल. त्यामुळे रुग्णांना रुग्णालय आणि त्यातील  बेडची माहिती ऑनलाइन मिळवणे शक्य होणार आहे. मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांची संख्या 44 हजार आहे.

मुंबईत रुग्णवाहिकांचा तुटवडा लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या वाढवत 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उबेर ॲपचे यासाठी सहकार्य घेण्यात येत असून या ॲपवर रुग्णवाहिकांचे लोकेशन दिसणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात रुग्णवाहिकांची कार्यक्षमता अधिक वाढून रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

मुंबईतील 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेड नॉनकोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील 100 टक्के खाटा देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व खाटांच्या वितरणाबाबत नियंत्रण कक्षाबाबत देखरेख केली जात असल्याचे ही आयुक्त चहल म्हणाले. शिवाय मुंबई महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या 1916 क्रमांकासाठी मार्गिका वाढविण्यात येत असून त्यावर तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा प्रतिक्षा कालावधी कमी होईल.

 मुंबईत रुग्णांची संख्या 56 हजारांच्या वर गेल्याने रुग्णालयांवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रुग्णांना बेड न मिळणे , कोरोना वॉर्ड मध्ये मृतदेह पडून राहणे , एका बेडवर दोन रुग्णांचा उपचार होणे याबाबतचे व्हिडीओ  प्रसारित झाल्याने पालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. रुग्णालय प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तिथे वॉररुम करण्यात येणार असून कोविड वॉर्ड, आयसीयू वार्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे.

ज्या कोरोना रुग्णांना डायलेसीसची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी coviddialysis.in पोर्टल तयार करण्यात आले असून डायलेसीससाठी उपलब्ध असणाऱ्या मशीनची माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे डायलेसीस अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळणार आहे.

now BMC will keep record of empty beds by barcode read full story 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT