ajoy mehta  
मुंबई

अरे वाह! पत्रकारांनाही मिळणार लोकलची सुविधा; मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य सेवा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत असलेल्या पत्रकारांना अजून ही सुविधा देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिल्यानंतर येत्या आठवडाभरात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे मुख्य सचिवांनी आश्वासन दिले आहे. 

केंद्र व राज्य सरकारने कोरोना संकटात पत्रकारांनाही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे. या काळात धोका पत्कारून पत्रकार हे जनतेला माहिती देण्याचे आणि कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. 

सध्या पत्रकारांना अनेकदा वार्तांकन मुंबई, मुंबई उपनगर आणि अन्य शहरात जावे लागत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वार्ताहर संघाच्यावतीने मुख्य सचिवांकडे करण्यात आली. 

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सद्या आरोग्य यंत्रणेसंबंधीत लोकांना लोकल रेल्वे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्य खासगी रुग्णालये देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मागणी करीत आहेत. त्यावर विचार करीत आहोत. त्यात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार आहे. 

येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले. यावेळी वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष दीपक भातुसे आणि माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे यांनी भेट घेऊन पत्रकारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी याविषयी चर्चा केली.

now local train will be available for journalists also 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना, विमानतळावर 'एक' फलंदाज नाही दिसला; दौऱ्याला मुकण्याची शक्यता... जसप्रीतनंतर आणखी एक धक्का?

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता

Satej Patil emotional post for father : सतेज पाटलांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, 'आधारवड हरपला..! दादांनी आयुष्यभर माणसं जोडली'

Marathi Live Updates News: ई-२० पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द

SCROLL FOR NEXT