maharshtra politics Uddhav Thackeray statement Shiv Sena overcome the challenges mumbai
maharshtra politics Uddhav Thackeray statement Shiv Sena overcome the challenges mumbai Uddhav Thackerays Latest News
मुंबई

"चेले चपाटे गेले, मार्गातील अडथळे दूर झाले"; उद्धव ठाकरेंनी पल्लवित केल्या आशा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणारं आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पहायला मिळाली. पण या परिस्थितीतही सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच या कार्यकर्त्यांमधील आशाही त्यांनी आता पल्लवित केल्यात. "चेले चपाटे गेले अन् तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाले" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आशा जागवल्या आहेत. (now obstacles removed from your path Uddhav Thackeray raised hopes in ShivSainik)

मातोश्रीवर भेटायला आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येकवेळी मी येणाऱ्या संकटाला संधी मानत आलो आहे, तशी आता आपल्याला संधी आहे. शहापूरचे जिल्हा परिषद सदस्य मला भेटायला आले होते. आता त्यांच्या मार्गातला अडथळा निघून गेला. तसेच तुमच्या मार्गातील अडथळाही निघून गेला. तुमच्यामध्ये आणि मातोश्रीमध्ये ज्यांनी भिंत बांधली होती ती आता पडून गेली आहे. आता बांध मोकळा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून जे चेले चपाटे पुढे आले होते ते चेले चपाटे आता गेले. ज्यांच्या श्रमावर ते मोठे झाले त्या शिवसैनिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्याचा हा थोडासा कठीण काळ आहे जो लवकरच निघून जाईल. आपण संघर्ष करु, ज्यांना मोठं केलं ती माणसं गेली. पण त्यांना मोठी करणारी साधी माणसं माझ्या सोबत आहेत. तीच माझी ताकद आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मला संकटाची पर्वा नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Case Live Updates: दाभोळकरांच्या हत्या प्रकरणातून तावडे पुनवळके आणि भावे याची निर्दोष मुक्तता

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

Latest Marathi News Live Update : पिंपळवंडी येथे बिबट्या जेरबंद; परिसरातील नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास

SCROLL FOR NEXT