best bus 
मुंबई

क्यूआर कोड'द्वारे भाडे भरा कोरोनाचा धोका टाळा; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'बेस्ट'चा निर्णय

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : वाढत्या गर्दीमुळे कोरोनापासून वाहक आणि प्रवासी यांचा बचाव करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. या आठवड्यात सर्वच बसगाड्यामध्ये ही योजना सुरु केली जाणार आहे.  या सुविधेसाठी बेस्टच्या वाहकाकडे क्यूआर कोड ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी मोबाइलद्वारे कोड स्कॅन करून यूपीआय अ‍ॅपद्वारे प्रवास भाडे भरू शकणार आहे.

बससेवा नियमित सुरू झाल्यानंतर बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ९ लाख १० हजारांच्याही पुढे गेली आहे. प्रवास भाडे घेताना विशेष करुन वाहकांचा प्रवाशांशी संपर्क येतो. रोख रक्कम स्वीकारताना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने ही देवाणघेवाण टाळण्याकरिता क्यूआर कोडद्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतल्याचे वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

वडाळा आगारांतर्गत आणि कुलाबा आगारांतर्गत काही मोजक्याच बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली. त्याचा प्रतिसाद चांगला असल्याने या आठवड्यात बेस्टच्या सर्व आगारातील बसमध्ये सुविधा राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ’फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, पेएटीएम, एचडीएफसी पेझॅप, एअटेल पेमेन्ट बँक अशा यूपीआय अ‍ॅपमधील क्यूआर कोड पद्धतीच्या सहाय्याने प्रवाशांना प्रवास भाडे भरता येणार आहे. 

बस वाहकाकडे क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार असू प्रवाशाने प्रवासाची माहिती दिल्यानंतर वाहक प्रवास भाडे सांगणार आहे. यानंतर प्रवासी आपल्या मोबाइल मधून वाहकाकडील क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही एका यूपीआय अ‍ॅपद्वारे भाड्याची रक्कम अदा करेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

ही रक्कम भरताच प्रवाशाच्या मोबाइलवर अदा केलेली रक्कम, बस वाहकाचा परिचय क्रमांक आणि आगार प्रदर्शित होणार आहे. वाहकाने या माहितीची खात्री केल्यानंतर प्रवाशाला तिकीट दिले जाणार आहे.

now QR code facility will be available in BEST bus also 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT