corona hospital 
मुंबई

आता कामगार रुग्णालयांमध्ये होणार कोरोना रुग्णांवर उपचार; मुंबई महापालिकेनं घेतला निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना रुग्णांसाठी रुग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडू लागल्याने महानगर पालिकेने आता शहरातील चार कामगार रुग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील महात्मा गांधी कामगार रुग्णालयात काही रुग्णांवर उपचारही सुरु करण्यात आले असून टप्पटप्प्याने वरळी, मुलूंड, कांदिवली येथील रुग्णालये ताब्यात घेतली जाण्याची शक्‍यता आहे.

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रायलयाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाची मुंबईत अंधेरीसह पाच ठिकाणी रुग्णालये आहेत. मात्र अंधेरीतील रुग्णालयात आगीत खाक झालेले असल्याने सध्या ते बंद आहे. कांदिवली येथील कामगार रुग्णालयात रुग्णालयात 300 खाटा आहेत. तर कांदिवली येथील कामगार रुग्णालयात 300 खाटा आहे.

वरळी आणि महात्मा गांधी कामगार रुग्णालय मिळून 1 हजार खाटा कोविड रुग्णालयासाठी तयार करण्यात येणार असून त्यात 300 आयसीयू खाटा असतील असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर गरज पडल्यास अंधेरी येथील रुग्णालयातही काही प्रमाणात उपचार सुरु केले जाऊ शकतील असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

कस्तुरबा,ब.ल.नायर,सेव्हन हिल्स ही महानगर पालिकेची आहे.सेंट जॉर्जेस आणि जी.टी ही राज्य सरकारची रुग्णालये संपुर्ण पणे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.तर,इतर रुग्णालयातील काही खाटा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र,तरीही सार्वजनिक रुग्णालयाती खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सर्व सार्वजनिक रुग्णालय मिळून 1 हजार 163 आयसीयू खाटा आहेत त्यात 1 हजार 152 रुग्ण आहेत. तर 5 हजार 202 ऑक्‍सिजन खाटां पैकी 3 हजार 905 रुग्ण आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा कल पाहता रुग्णालयात अतिरीक्त खाटांची गरज भासणार आहे.त्यामुळे महानगर पालिकेने आता कामगार रुग्णालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या लक्षणं नसलेल्या कोविड बाधित रुग्णांवर कोविड उपचार केंद्रात उपचार केले जातात. अथवा घर मोठे असल्यास त्यांना घरी राहाण्याचा सल्लाही दिला जातो. तर जेष्ठ नागरीक तसेच इतर दिर्घकालीन आजार आणि कोविड बांधेची प्रखर लक्षण असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते.

now treatment on corona patients wil done in labour hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT