कोरोना चेक. 
मुंबई

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना आटोक्‍यात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

वसंत जाधव

 नवीन पनवेल, ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांना यश येत असल्याचे चित्र पनवेलच्या ग्रामीण भागात आहे. कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असताना तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी शहरासह आता पनवेल ग्रामीण भागातही रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते यांनी दिली. 

पनवेलच्या ग्रामीण भागात 3 सप्टेंबरपासून अँटीजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हापासून 21 ऑक्‍टोबरपर्यंत पनवेल ग्रामीण भागातील अजिवली, गव्हाण, आपटा, वावंजा, नेरे इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रात 3,566 रॅपिड ऍन्टीजन टेस्ट झाल्या. त्यामध्ये 455 रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, तर 3,111 टेस्ट या निगेटिव्ह आलेल्या आहेत. 


सुरुवातीला ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसाला 200 ते 300 टेस्ट केल्या जात होत्या; तर सध्या या भागात दिवसाला 30 ते 50 टेस्ट केल्या जात आहेत. या महिन्यात पावसामुळेही चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाद्वारे स्क्रीनिंग करताना लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 6,722 कोरोना रुग्ण असून त्यामधील 6,276 रुग्ण बरे झाले आहेत; तर आतापर्यंत 129 मृत्यूची नोंद झाली असून सद्यस्थितीत 317 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आहेत. 

उपजिल्हा रुग्णालयावर ताण
ग्रामीण, महापालिका क्षेत्रासाठी एकच रुग्णालय पनवेल ग्रामीण आणि शहरातील रुग्ण पनवेल येथील एकाच उपजिल्हा रुग्णालयांवर अवलंबून आहेत. त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र व तालुक्‍याचा ताण एकाच रुग्णालयावर येत आहे. 

 
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब सहभागी होत आहे. आरोग्य विभाग ग्रामीण भागातील घराघरात पोचत आहे. त्यामार्फत मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याविषयी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यावर जास्त भर दिला जात आहे. रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. 
डॉ. सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल 
 

The number of corona patients is less in rural Panvel

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Megablock: रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर ५ दिवस मेगाब्लॉक; कुठं आणि कधीपासून? पाहा वेळापत्रक...

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : IRS अधिकारी आकाश जैन यांची NTA येथे सहसंचालकपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT