kuposhan 
मुंबई

कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक, प्रशासनाचं दुर्लक्ष होतय का?

सकाळवृत्तसेवा

शहापूर : तालुक्यात 0 ते 6  वयोगटातील 90 बालके तीव्र कुपोषित (सॅम) तर 589 बालके मध्यम कुपोषित (मॅम) असल्याचे सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

बाल विकास विभागाच्या शहापूर आणि डोळखांब प्रकल्पात एकूण 569 अंगणवाड्या कार्यरत आहेत. शहापूर प्रकल्पातील अंगणवाडयामध्ये 0 ते 6 वयोगटात 13 हजार 544 तर डोळखांब प्रकल्पातील अंगणवाड्यामध्ये 11 हजार  906 बालके अशी एकूण 25 हजार 450 बालके सर्वेक्षीत आहेत. यापैकी शहापुर  प्रकल्पात सद्यस्थितीला 0 ते 6 वयोगटातील 16 बालके तीव्र कुपोषित(सॅम) आणि 244 बालके मध्यम कुपोषित (मॅम) आहेत. तर डोळखांब प्रकल्पात 0 ते 6 वयोगटात 74 तीव्र कुपोषित (सॅम) आणि 345 मध्यम  कुपोषित (मॅम) बालके आहेत. अशाप्रकारे दोन्ही प्रकल्पात मिळून तालुक्यात एकूण 90 बालके तीव्र कुपोषित तर 589 बालके मध्यम कुपोषित आहेत.

त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यात एकूण 679 बालके तीव्र व मध्यम कुपोषित असल्याने या सर्वांना कुपोषणातुन  बाहेर आणण्यासाठी बालविकास प्रकल्प विभाग व आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याची मागणी विविध सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. 

number of malnourished children in Shahapur taluka is alarming - 90 acute, while 589 moderately malnourished children

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

SCROLL FOR NEXT