corona
corona 
मुंबई

दिलासादायक...रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली... 

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी मुंबईकरांची चिंता काहीशी कमी झाल्याचे दिसते. येथील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे रुग्णालयांंवरील ताण कमी होतोय.

लॉकडाऊनच्या चौथ्या महिन्यात राज्यातील रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. राज्यात दररोज आठ हजाराच्या वर नवे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसते. मुंबईत सरासरी ८०० ते १२००  नवीन रुग्ण सापडत असून त्यातील केवळ सहा टक्के म्हणजे १५० ते १८० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे रुग्णालयांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होत असल्याचे दिसते.

गेल्या महिन्यातील दोन जूनच्या आकडेवारीनुसार ३०,०६३ रुग्णांपैकी ११, ६४२  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते त्यातील २५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील ९६३ रुग्ण गंभीर होते. त्यातील. तर २१ जुलैला बाधित रुग्णांची संख्या २३, ८६३ इतकी होती. त्यातील ५, २५२  बरे झाले. १,२८६ गंभीर आजारी असल्याचे कळते. त्यातील केवळ सहा टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. एका महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे दिसते.

मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढली आहे. ज्या परिसरात अधिक रुग्ण सापडत आहेत. तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर करून तो भाग सील केला जातोय. पालिकेने अनेक ठिकाणी फिव्हर कॅम्प सुरू केले आहेत. लोकांची ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय लोकांमध्ये जनजागृती करण्यात आल्याने नवीन रुग्णांची संख्या घटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

पालिकेकडील कोविड19 रुग्णांसाठी राखीव असलेल्या बेडची संख्या २२,१५७  इतकी आहे. त्याशिवाय खासगी रुग्णालयातील १२,००२ बेड सध्या पालिकेच्या ताब्यात आहेत. सध्या मुंबईतील ९० टक्के आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड पालिकेच्या ताब्यात आहेत. शिवाय ४० टक्के ऑक्सिजन बेड आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी आवश्यक बेड उपलब्ध असून रुग्णांची फरफट थांबणार असल्याचा दावा केला जातोय.

संपादक- सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT