corona 
मुंबई

मुंबईकरांना दिलासा! कोरोना बाधितांच्या संख्येत झाली घट

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : मुंबईत कोविड 19 च्या बाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारच्या तुलनेत आज घट झाली. शु्क्रवारी मुंबईत 397 रुग्णांची नोंद झाली होती, त्यातुलनेत आज 281 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईकरांनी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 281 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 4870 येऊन पोहोचला आहे. तसेच आज 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

आज मुंबईत 281 नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 4870 झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आज केवळ 203 रुग्ण आढळले असून उर्वरित 78 रुग्ण 22 एप्रिल रोजी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. आज झालेल्या 12 मृत्यूंपैकी 6 जणांना दीर्घकालीन आजार होते तर  4 रुग्णांच्या मृत्यूचे कारण वार्धक्याशी संबंधित होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 9 पुरुष तर 3 महिलांचा समावेश होता. त्यामुळे मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 191 झाला आहे. आज एकूण 357 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 7963 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ज्येष्ठ नागरिक, असंसर्गजन्य व जोखमीचे आजाराबद्दल सर्वेक्षण 
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पालिकेने उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे आजार तसेच दमा असे आजार असलेले व ज्येष्ठ नागरिक यांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णांना त्यांची औषधे नियमितपणे घेत असल्याची खातरजमा करण्यात येणार आहे.  शिवाय नियमितपणे औषध घेण्यासाठी सल्ला देण्यात येणार आहे. तसेच पालिकेकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणादरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात येणार आहे. रुग्णांमध्ये अक्सिजन पातळी कमी आढळल्यास पालिकेच्या जवळच्या नॉन कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT