मुंबई

आंदोलनाच्या भीतीने अधिकारी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघर सेक्‍टर २६ ते ३६ परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता. ३०) तळोजा-खारघर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आंदोलनाच्या भीतीने सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ५ फेब्रुवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने नागरिकांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

खारघर सेक्‍टर २६ ते ३६ परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ३० जानेवारीपासून सिडकोच्या खारघर कार्यालयासमोर ‘वचन दिलाओ, रस्ते बनाओ’ अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येणार होते.

नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती खारघर सेक्‍टर २५ ते ४० विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांना प्राप्त होताच त्यांनी खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्‍यांना बोलावून रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजवले जातील, असे लेखी आश्‍वासन दिले आहे. 

नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे सिडको अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० मार्चपर्यंत सेक्‍टर २५ ते ३६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे.
१० मार्चपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT