मुंबई

मुंबईतील चाळींमध्ये राहणाऱ्यांची पाण्याची चिंता मिटली, आता मिळणार मुबलक पाणी

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील चाळींमधिल पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. चाळींच्या परीसरात भुमिगत पाण्याची टाकी बसवण्याची परवानगी मुंबई महापालिकेेने दिली आहे.

मुंबईतील उपकार प्राप्त इमारती या 80 वर्षांपेक्षा जून्या आहेत. या चाळींमध्ये नव्या इमारतींप्रमाणे पाणी साठविण्यासाठी भुमिगत टाक्या नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून आलेले पाणी घराघरात साठवले जाते. मात्र, घरे लहान असल्याने घरात पाणी साठवण्यावर मर्यादा आहे. या चाळींमध्ये राहणाऱ्या दोन तीन पिढ्यांनी पाण्यासाठी हाल सोसले आहेत.

आता घरात पाण्याच्या टाक्या असल्यातरी पुर्वी लहान मोठ्या भांड्यातही पाणी साठवले जात होते. नव्या टॉवरमध्ये मुबलक पाणी मिळते तर जून्या चाळींमध्ये नेहमीच पाण्याची बोंब असते. अशा तक्रारी रहिवाशांकडून नेहमीच केल्या जात होत्या.

भाजपच्या नेहल शहा यांनी डिसेंबर 2019 मध्ये पालिकेच्या भुखंडावरील जून्या चाळींना भुमिगत पाण्याची टाकी बांधण्याची परवानगी द्यावी अशी ठरावाची सूचना मांडली होती. त्यावर प्रशासनाकडून महासभेत उत्तर सादर करण्यात आले आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उपकर प्राप्त इमारतीचे भुखंड हे मक्त्याने दिलेले आहेत. मक्ताधारकांनी पाण्याची टाकी बांधण्याची परवानगी मागितल्यास पालिककडून देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

नक्की काय होतं 

चाळींमध्ये भुमिगत टाक्या नसल्याने पालिकेचे पाणी थेट घरापर्यंत पुरवले जाते. या चाळी चार ते पाच मजली किंवा त्याहून जास्त मजल्याच्या आहेत. पाण्याचा दाब कमी असल्यास पाणी वरच्या मजल्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभिर होते.

काय फायदा होईल 

पालिकेकडून आलेले पाणी भुमिगत टाकीत साठवणे शक्य होणार आहे. हे पाणी पंपच्या सहाय्याने चाळीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहचविणे शक्य होईल.

( संपादन - सुमित बागुल ) 

old chawls in mumbai will get more water as BMC gave permission for underground water tanks

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT