File Photo 
मुंबई

एमसीएच्या परीक्षेत जुनी प्रश्‍नपत्रिका!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा परीक्षेतील भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. विद्यापीठाने 11 डिसेंबर रोजी घेतलेल्या मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सेमिस्टरमधील "स्टॅटेस्टिक ऍण्ड प्रोबॅबिलिटी' या विषयाच्या परीक्षेत मे 2018 ची हुबेहूब प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रश्‍नपत्रिकेत 80 पैकी तब्बल 70 गुणांचे प्रश्‍न जसेच्या तसे देण्यात आल्याने परीक्षा विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रश्‍नपत्रिकेत पर्यायी प्रश्‍न न देणे, चुकीचे प्रश्‍न देणे, महाविद्यालयाची सराव प्रश्‍नपत्रिकाच मुख्य परीक्षेला देणे, असे अनेक प्रकार मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत झाले आहेत; मात्र विद्यापीठाने या प्रकारांची गंभीर दखल न घेतल्याने, असेच प्रकार पुन्हा पुन्हा उघड होत आहेत. एमसीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या सेमिस्टरच्या "स्टॅटेस्टिक ऍण्ड प्रोबॅबिलिटी' या विषयाची परीक्षा विद्यापीठाने 11 डिसेंबर रोजी घेतली. या परीक्षेत मे 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली.

मे 2018 च्या परीक्षेवेळी प्रश्‍नपत्रिकेचा कोड क्रमांक 38183 होता; तर 11 डिसेंबर रोजी घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा कोड क्रमांक 59330 असा आहे. दोन्ही प्रश्‍नपत्रिकांची तुलना करता जुन्या प्रश्‍नपत्रिकेतील 80 गुणांपैकी 70 गुणांचे प्रश्‍न हे हुबेहूब देण्यात आले आहेत; तर प्रश्‍न क्रमांक 1 मधील सी आणि प्रश्‍न क्रमांक 6 मधील डी हे प्रश्‍न वेगळे आहेत. हे दोन्ही प्रश्‍न प्रत्येकी 5 गुणांचे आहेत. या प्रकाराने विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

एमसीए अभ्यास मंडळ बदललेले असले, तरी सदस्य मात्र तेच आहेत. ही बाब आम्ही प्र-कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतरही विद्यापीठ सुधारण्याचे नावच घेत नसल्याने नाहक हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सर्वच अभ्यास मंडळांमध्ये नेहमी तेच सदस्य कसे असतात, याची सखोल चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे; अन्यथा असे प्रकार होत राहतील. 
- प्राध्यापक सुभाष आठवले
, महासचिव, मुक्ता शिक्षक संघटना

या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. 
- डॉ. विनोद पाटील,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT