मुंबई

NCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार ? नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं ? चर्चा तर होणारच !

सुमित बागुल

मुंबई : भाजपाचे सर्वात जेष्ठ, जुने जाणते नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पक्ष सोडावा लागला असं परखड मत माध्यमांसमोर मांडलं आहे. मला पक्षात मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न केला गेल्याचंही एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अधीरेखित केलं. 

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडून जाऊ नये असं आम्हाला वाटत होतं, असं भाजपातील नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळालेला आहे. भाजपकडून एकनाथ खडसे याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं पत्रकार परिषद घेत सांगण्यात आलंय. 

कोणतं पद ? कोणतं खातं ? चर्चा तर होणारच ! 

आता एवढा मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हंटल्यावर त्यांना कोणतं पद किंवा खातं दिलं जातं याबाबत चर्चा तर होणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका मंत्र्यांचं खातं एकनाथ खडसे यांना दिलं जाणार असल्याची चर्चा आता राजकीय परिघात सुरु झालीये. राष्ट्रवादीमधील एका मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असं सूत्रांकडून समजतंय. सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीप्रमाणे एकनाथ खडसे यांना कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या याबाबत राष्ट्रवादीमध्ये चर्चा झालेली आहे. यानुसार एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ आमदारांच्या राज्यपालांकडे शिफारसी करण्याचं ऐन वेळी थांबवण्यात आलेलं. त्याच कारण म्हणजे एकनाथ खडसे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी देता येईल अशी चर्चा सुरु असल्याचं समजतंय. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देऊ शकतो असं बोललं जातंय. जो मंत्री राजीनामा देईल त्यांची वर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर लागू शकते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

दरम्यान एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर भाजप विरुद्ध खडसे असा  जंगी सामना रंगताना पाहायला मिळेल असंही राजकीय विश्लेषक म्हणतायत. 

one minister from NCP to resign his post for eknath khadse says sources

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT