versova 
मुंबई

कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील आणखी एक कोळीवाडा सील

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील निम्म्या खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणारे आणखी एका कोळी गावातील लोकांना घरातच राहावे लागणार आहे. वरळी कोळीवाडा पाठोपाठ या गावातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने संपूर्ण गावच सील करण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील वर्सोवा कोळीवाडा हा मुंबईतील सर्वात मोठा कोळीवाडा आहे. या कोळीवाड्यातून दरवर्षी साधारण 400 कोटी रुपयांची मासळी विकली जाते; मात्र या गावात आतापर्यंत 50 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण गावच सील करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी पोलिसांना या परिसरात लॉकडाऊन कठोरपणे राबवण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. वर्सोवा गाव हे उपनगरातील कोळी समाजाची सर्वात मोठी वस्ती असून तेथे इतर समाजाचे कुटुंबही राहतात. हा परिसर बराच दाटीवाटीचा आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड आहे. वरळी कोळीवाड्यासारखीच दाटीवटीची वस्ती या गावात आहे.

या भागातील औषधाची दुकाने  पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येत आहे. तर इतर अत्यावश्यक सेवांची दुकाने ठराविक काळासाठी सुरु राहातील, याची खबरदारी घेतली जात आहे. वरळी कोळीवाडा पूर्णपणे सील केल्यानंतर तेथील रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. त्यानंतर वर्सोवा कोळीवाड्यातही हाच उपाय केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT