धारावीत कोरोना नियंत्रणात येतोय; 
मुंबई

कोरोनाबाॅम्ब ठरलेल्या धारावीतून गुड न्यूज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारवीसह दादर-माहीम परिसरात आज केवळ 62 रुग्णांची भर पडली. धारावीत आज केवळ 12 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 2170 वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे आज ही एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. 

धारावीत आज 12 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 2170 वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून  मृतांचा आकडा 80 इतका झाला आहे. तर माहीम मध्ये आज 21 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 923 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 14 इतका आहे. तर दादर मध्ये आज 29 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या ही 662 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 16 मृत्यू झाले आहेत. 

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात 62 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 3755 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 110 इतका आहे.  धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील दिलासादायक  वाढ झाली आहे. आज जी उत्तर विभागात 12 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत दादर 270 , माहीम 366 तर धारावीत 1057 असे एकूण 1693 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT