मुंबई

#HopeOfLife : कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी एकच डॉक्टर! धक्कादायक वास्तव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णसंख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या अत्यल्प आहे. कर्करोगाच्या तब्बल तीन हजार रुग्णांमागे केवळ एक तज्ज्ञ डॉक्‍टर असल्याची माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. 

भारतात कर्करोगाचे जवळपास 35 ते 40 लाख रुग्ण असून दरवर्षी सात ते आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तसेच दरवर्षी 10 लाखांहून अधिक कर्करोगाच्या नव्या रुग्णांची नोंद होते. 2018 च्या आकडेवारीनुसार भारतात 11 लाख 57 हजार नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे; मात्र वाढत्या रुग्णांच्या तुलनेत कर्करोगाच्या उपचारात नैपुण्य मिळवलेल्या डॉक्‍टरांची संख्या प्रचंड कमी आहे. अमेरिकेत 390 रुग्णांमागे एक डॉक्‍टर आहे; तर भारतात अडीच ते तीन हजार रुग्णांमागे एकच डॉक्‍टर आहे. विशेष म्हणजे त्यातील 70 टक्के डॉक्‍टर हे शहरी भागात असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे भारतातील डॉक्‍टरांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्याचे दोन ते तीन हजार रुग्णांमागे एक डॉक्‍टर हे प्रमाण दोन हजार रुग्णांपेक्षा कमी करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

भारतात खास कर्करोगासाठी 27 ते 28 रुग्णालये आहेत. तसेच 300 च्या आसपास रुग्णालयांत कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे; मात्र रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. कर्करोगाच्या तज्ज्ञांची आणि रुग्णालयांची संख्या कमी असण्याचे कारण म्हणजे कर्करोग तज्ज्ञांच्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या कमी जागा होय. डॉक्‍टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णसेवेवरही ताण येतो. भारतात कर्करोगाबद्दलची भीती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी उपचारासाठी जास्त वेळ द्यावा अशी अपेक्षा रुग्णांची असते; मात्र प्रचंड ताणामुळे डॉक्‍टरही रुग्णांना अपेक्षित वेळ देऊ शकत नाहीत. 

विशेषज्ज्ञांसोबतच सर्जनची गरज 
देशात कर्करोगाच्या उपचारांसाठी विशेषज्ञांची गरज आहे; मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विशेषज्ज्ञ तयार होणे शक्‍य नाही. त्यामुळे कर्करोग विशेषज्ज्ञांची जशी गरज आहे, त्याप्रमाणे कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनचीही आवश्‍यकता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 

कर्करोगाचे वैद्यकीय अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था 

- प्रकार - संस्था - एकूण जागा 
मेडिकल ऑन्कोलॉजी 29 87 
क्‍लिनिकल हेमिटोलॉजी 9 18
रेडिएशनल ऑन्कोलॉजी 86 229
सर्जिकल ऑन्कोलॉजी 32 89 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT