कोव्हिडमुक्त भारत विषयावर खुली ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 
मुंबई

कोव्हिडमुक्त भारत विषयावर खुली ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरातील नागरिकांसाठी कोव्हिडमुक्त भारत या विषयावर खुली ऑनलाईन कोविड फ्री इंडिया या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ युनेस्को क्‍लब्ज अँन्ड असोसिएशन ऑफ इंडिया (सीयुसीएआय) तर्फे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी युनेस्को स्कूल क्‍लब महाराष्ट्र सहकार्य करीत आहेत. तसेच माध्यम प्रायोजक 'सकाळ' वृत्तपत्र सहकार्य करीत असल्याची माहिती स्पर्धा प्रसिद्धी व संपर्क प्रमुख वर्षा प्रमोद चोपदार यांनी दिली आहे. स्पर्धेतील अव्वल विजेते निवडण्यात येऊन त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. तर स्पर्धकांना सहभागी झाल्यानंतर त्वरित सहभाग प्रमाणपत्रही प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास 3500 रुपये, प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहे; तर द्वितीय व तृतीय येणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे 2500 रुपये, 1500 रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच चार ते 10 क्रमांक पटकावणाऱ्यांना देखील उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून 500 रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम 150 चित्रांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल. 

या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कोरोनामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित तुमचे विचार चित्राच्या माध्यमातून व्यक्त करून जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युनेस्कोचे राष्ट्रीय महासचिव योगेश कुलश्रेष्ठ, स्पर्धा संयोजिका शशी भदुरीया, राज्य समन्वयक विजय पावबाके, स्पर्धा प्रसिद्धी व संपर्क प्रमुख वर्षा प्रमोद चोपदार यांनी केले आहे. 

प्रजासत्ताकदिनी निकाल 
स्पर्धेचा निकाल 26 जानेवारी 2021 रोजी घोषित केला जाईल. या स्पर्धेत प्रक्रिया शुल्क 10 रुपये असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेची नियमावली जाणून घेण्यासाठी http://unescoclubsmh.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अशी माहिती वर्षा प्रमोद यांनी दिली. (स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे चित्र काढण्यासाठी वयाची अट नाही. सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.) 

-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT