मुंबई

ST कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रकरणी कामगार आयुक्तांचे चौकशीचे आदेश  

सुमित बागुल

मुंबई : राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत आता कामगार आयुक्तांनी चौकशीचे आदेश आदेश दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. दरम्यान, पगार न दिल्याने कायद्याचा भंग होत असल्याचं निदर्शनास आले आहे. या कारणामुळे राज्य परिवहन मंडळाला म्हणजेच ST मंडळाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे. मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे. 

गेल्या तीन महिन्यांचे ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. पगार मिळावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, कोणत्याही प्रकारची पावलेही उचलली जात नसल्याने राज्य परिवहन मंडळाशी निगडित संस्थांनी आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांचे दरवाजे ठोठावले होते. प्रत्येक विभागाने आपापल्या विभागीय कामगार आयुक्तांच्या भेटी घेतल्यानंतर आता मुंबईतील मुख्य कामगार आयुक्तांनी याप्रकरणी विभागवार चौकशी करून विभागवार बैठक लावल्या.

या बैठकीनंतर ST महामंडळाचे कर्मचारी आणि या संघटनांना एकत्र बोलावून निर्णय घेण्यात येईल. दरम्यान या तपासाअंती ST कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नाहीत ही बाब समोर आली तर मात्र यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

Order of inquiry by the Commissioner of Labor in the case of overdue wages of ST employees

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT