quarantine
quarantine 
मुंबई

धक्कादायक!  महिनाभरात तब्बल 'इतके' लाख मुंबईकर झाले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशात कोरोनाचे तब्बल ९६ हजार पेक्षा जास्त रुग्ण आहेत तर ३००० पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. मुंबईत  क्वारंटाईन केलेल्या लोकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावं असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला क्वारंटाईन केलं जातंय. मात्र गेल्या महिनाभरात या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या संख्येत तब्बल अडीच लाखांनी वाढ झाली आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातल्या लोकांना क्वारंटाईन केलं जातंय. जोपर्यंत त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन केलं जातंय. त्यामुळेच क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतात अशा लोकांनाही पहिले क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्यात येतं. 

१५ एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४३ हजार २४९ जण होम क्वारंटाईन होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे १३ मेपर्यंत या संख्येत तब्बल २ लाख ३४ हजारांनी वाढ झाली आहे. म्हणजेच मुंबईत कोरोनामुळे क्वारंटाईन केलेल्या लोकांमध्ये तब्बल ४४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे अशा २ लाख ३४ हजार लोकांपैकी १२ हजार ६३६ लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर यापैकी  ९५ हजार १५४ जणांनी त्यांचा १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. प्रशासन या सर्व क्वारंटाईन असणाऱ्या लोकांवर सतत लक्ष ठेवण्याचं काम करत आहे. यापैकी कुणालाही लक्षणं आढळली तर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. 

over 2 lacs people are quarantine in mumbai in just one month read full story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT