Barge-P305
Barge-P305 
मुंबई

P305 दुर्घटना: पाच कंपन्यांना समन्स, 10 जणांचे जबाब नोंदवले

सकाळ वृत्तसेवा

ओळख न पटणाऱ्या 28 मृतदेहांची DNA चाचणी

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आणि अनेकांचे प्राण गेले. त्यातच, बाॅम्बे हायवरील (Bombay High) तेल उत्खनन करणऱ्या P305 हे बार्ज चक्रीवादळात बुडाले. या बार्जवरील (P305 Barge) झालेल्या दुर्घटनेप्रकरणी यलोगेट पोलिसांनी 5 कंपन्यांना समान्स (Summons) बनावले आहे. या प्रकरणी आज 10 जणांना जबाब नोंवदले आहेत. 28 मृतदेहांची (Dead Bodies) ओळख पटली नसून त्यांची DNA चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (P305 Barge Accident 5 Companies Summoned 10 statements recorded 28 Dead Bodies goes under DNA Test)

दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लाव इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यलोगेट पोलिसांनी P305 तराफावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून बार्ज बुडेपर्यंतचा घटनाक्रम पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नौदलामुळे सुरक्षितरित्या बचावलेले शेख सध्या ताडदेव अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायजवळील तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला P305 हा तराफा समुद्रात बुडाला.

या तराफ्यावरील 26 कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी रात्रीपर्यंत मिळाले होते. आणखी 23 कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 49 झाला आहे. त्यातील 28 जणांची ओळख पटली नसून त्यासाठी DNA चाचणी करण्यात येणार आहे. पी 305 या तराफावर एकूण 261 कर्मचारी होते. दरम्यान, नौदलाची शोधमोहिम सुरू आहे. INS कोलकाता ही युद्धनौका बुधवारी रात्री उशिरा बचावलेले कर्मचारी आणि मृतदेह घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली.

INS बियास ही युद्धनौका आणखी काही मृतदेह घेऊन गुरुवारी मुंबईत परतली. या तराफाशिवाय वरप्रदा या नौकेलाही जलसमाधी मिळाली. त्यावरील 2 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून उर्वरित 11 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. समुद्रात तौत्के चक्रीवादळ येणार आहे, याची पूर्वकल्पना असतानाही तराफा P305 च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ONGCच्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट अ‍ॅफकॉन कंपनीकडे होते. याच अ‍ॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी तराफा P305 वर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT