मुंबई

Palghar: बालकांना पोषण आहार देण्यासाठी प्रशासन सरसावले, दत्तक पालक योजना केली सुरू!

भगवान खैरनार

Palghar: राज्यात गेली दिड महिण्यापांसुन सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या बेमुदत संपामुळे बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने, अंगणवाडी सेविकांना कामावर हजर होण्यासाठी नोटीसा बजावुन तसेच संवेदनशील आवाहन करूनही त्या संपावर ठाम राहिल्या आहेत. अखेर प्रशासनाने पालघर जिल्ह्यात दत्तक - पालक योजना तसेच ग्रामपंचायती च्या माध्यमातून कुपोषीत बालकांना घरपोच पोषण आहाराचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुपोषीत बालकांना दिलासा मिळणार आहे. 

   राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संपाची धार अधिकच तीव्र केली आहे. त्यांनी   4  डिसेंबर  2024  पासून राज्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अंगणवाडी कर्मचार्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळावा, शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, दरमहा निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि अंगणवाडी च्या कामकाजासाठी मोबाईल फोन द्यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांवर ठाम आहेत. अंगणवाडी मार्फत किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनदा माता, शुन्य ते सहा वयोगटातील बालकांना पुरक पोषण आहार, पुर्व शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि संदर्भीत सेवा पुरविण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे कुपोषीत बालकांना सकस आणि पौष्टिक पोषण आहार देणे आहे. संपामुळे ही सर्व कामे बंद पडली आहे. तर मासिक मिटींगा, मासिक अहवाल, ट्रेनिंग, ऑनलाईन माहिती भरणे ही सर्व प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. 

                  पालघर जिल्ह्यात  2   हजार   799   अंगणवाडी केंद्र आहेत. त्यामध्ये  1  लाख   48   हजार   320  बालके आहेत. त्यापैकी  2  हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यांना गेली दिड महिण्यापांसुन अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार मिळालेलाच नाही. त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर हजर होण्यासाठी नोटीसा बजावल्या तसेच निलंबनाच्या कारवाई बाबत ही सुचना दिल्या आहेत. मात्र, सेविका आणि मदतनीस आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्या आहेत. 

संवेदनशील आवाहनाला धुडकावले......

प्रशासनाने सरपंच आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना संवेदनशील होत कामावर हजर होण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, हे आवाहन सेविका आणि मदतनीसांनी धुडकावले आहे. काही ठिकाणी याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मोखाडा तालुक्यात केवळ दोन अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या आहेत. तर काही ठिकाणी बचत गटांनी कुपोषीत बालकांना पोषण आहार देणे सुरू केले आहे. 

अधिकारी आणि कर्मचार्यामार्फत दत्तक पालक योजना......

पालघर जिल्हा परिषदेने कुपोषणाला आळा घालण्यासाठी पुर्वी दत्तक पालक योजना अंमलात आणली होती. आता अंगणवाडी सेविकांच्या संपाच्या काळात ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संबंधित ठिकाणी नेमून दिलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना कुपोषीत बालकांना पोषण आहार देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यम कुपोषीत बालकांची तब्ब्येत खालाऊ नये म्हणून सामुदायिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व ईतर कर्मचार्यांवर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

ग्रामपंचायती च्या माध्यमातून सकस आहाराचे किट..

ग्रामपंचायती कडे महिला व बाल विकासासाठी  10  टक्के निधी असतो. त्या निधीतून कुपोषीत बालकांना शेंगदाणे, गुळ, राजगीरा लाडु, खजूर आणि चणे याचे एक किट तयार करून ते घरपोच वाटप करण्यात येणार आहे. त्या बाबतच्या सुचना प्रत्येक ग्रामपंचायती ला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुपोषीत बालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात मोखाड्यात भरीव कामगिरी

कुपोषण ग्रस्त मोखाडा तालुक्यात  207  अंगणवाडी केंद्रांपैकी  52  अंगणवाडी केंद्र नियमीत सुरू झाले आहेत. तसेच प्रशासनाच्या आवाहनानंतर  17  ठिकाणी बचत गटांमार्फत बालके तसेच गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार देणे सुरू झाले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुन्हा एका नोटीसीद्वारे संवेदनशील होऊन कामावर हजर होण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT