Sicilian sakal media
मुंबई

पालघर : विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ प्रजातीचा देवगांडूळ

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड येथील एन. डी. वाडेकर यांच्या घराजवळ देवगांडूळ (Sicilian animal) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापसारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. विक्रमगड (vikramgad) येथील सर्पमित्र पार्थ पटेल (parth patel) यांना लोकांनी कळवताच घटनास्थळी धाव घेत प्रथम दर्शनी हा मांडूळ असल्याचा लोकांना अंदाज होता. परंतु सर्प मित्र पार्थ पटेल यांनी नीट निरीक्षण केल्यानंतर हा मांडूळ नसुन उभयचर जीव ग्रामीण भाषेत देवगांडूळ बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. या देव गांडूळाला सुरक्षित स्थळी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएससी (प्राणीशास्त्र) चे शिक्षण घेतलेले सर्पमित्र ऋषिकेश शेलका यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की सिसिलियन आपल्या पालघरच्या बोली भाषेत 'वावीर' मराठीत बोलतात. हा एक उभयचर वर्गातील प्राणी आहे. पाय नसल्यामुळे आणि निमुळत्या लांब शरीरामुळे प्रथदर्शनी तो सापासारखा वाटतो. ते आपला बहुतेक जीवनकाळ ओलसर जमिनीच्या खाली घालवतात त्यामुळे ते आपल्याला खूप कमी परिचित आहेत. ते अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आढळून येतात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने गांडूळाचा समावेश होतो.

Sicilian

वावीर पूर्णपणे पायविहरीत असतात, त्यांच्या लहान प्रजाती गांडूळ सारख्या आणि मोठ्या प्रजाती 5 फुटापर्यंत लांब आणि सापा सारख्या वाटतात. त्यांची त्वचा गुळगुळीत आणि प्रामुख्याने गडद पण काही प्रजाती मध्ये रंगीबेरंगी त्वचा दिसून येते. स्वतःला वाचवण्यासाठी साठी ते त्वचे मधून विषारी द्रव्य सोडतात. त्वचेमधून निघणाऱ्या द्रव्यात Siphonops paulensis नावाच्या द्रव्याचा समावेश असतो. वावीर ची दृष्टी फक्त अंधारात बघण्यासाठी विकसित झालेली असते आणि ते आपला बहुतेक जीवनकाळ जमिनीखाली घालवतात.

त्यांची डोक्याची कवटी आणि टोकदार तोंडाचा भाग चिखलातून वाट काढायला वापरतो. त्याच्या शरीराचे स्नायू चिखलातून वाट काढन्याच्या दृष्टीने विकसित झालेले आहेत. सर्व सिसिलियन प्रजाती डोळे आणि नासिका मधे असलेल्या संवेदनाग्र (antenna) चा वापर संवेदने साठी करतात. सगळ्या सिसिलियन प्रजातीमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी फुफुसे असतात पण त्याचबरोबर ते त्वचा आणि तोंडाचा वापर सुदधा करतात. त्यांचं डाव फुफुस उजव्या फुफुसापेक्षा खूपच लहान असते, असे अनुकूलन सापांमध्ये सुदधा दिसून येते.

75% सिसिलियन प्रजाती हे जिवंत पिलांना (viviparous) जन्म देतात तर इतर २५% प्रजाती अंडी ( oviparous) देतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येई पर्यंत रक्षण करतात. प्रौढ सिसिलियन कीटक, गांडूळ, वाळवी ह्यावर गुजराण करताना आढळून येतात. सापासारखा दिसणारा, सरपटणारा आपल्या आसपासच असून आपल्या नजरेपासून लपून आहे. तसेच गैरसमजुती मुळे साप समजून मारण्याचे प्रमाण आहे. वाविर हा उभयचर भारतातून लुप्त होत चालला असून ज्या ठिकाणी जलसाठे प्रदूषण विरहित आणि स्वच्छ असतात अश्याच ठिकाणी आढळतो.

आपल्या परिसरात तो आढळतो याचा अर्थ अजूनही आपल्या इथे गोड्या पाण्यातील जैवविविधता बऱ्याच अंशी टिकून आहे. सिसिलियन (वावीर) पासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला सुद्धा हा आगळा वेगळा जीव दिसल्यास त्याला न मारता वाचवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन Msc (प्राणीशास्त्र) चे शिक्षण घेतलेले सर्पमित्र ऋषिकेश शेळका यांनी केले आहे.

"उभयचर जिव (सिसिलिअन) हा विक्रमगड भागात मिळण्याची तिसरी वेळ आहे. हा जिव दुर्मिळ झाला असुन. साप समजून या जिवाला मारले जाते त्यामुळे या जीवाची संख्या कमी झाली आहे. त्याच्या संवरक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागात याला देवगांडूळही बोलतात."

-पार्थ पटेल , सर्पमित्र विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT