मुंबई

मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे निलंबित 

मुरलीधर दळवी

मुरबाड (ठाणे) - मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना मुरबाड बाजार पेठेतील 250 अनधिकृत आर सी सी व्यापारी गाळ्यांच्या बांधकाम प्रकरणात निलंबित करण्यात आल्याने गाळे धारकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात नगरसेवकही सहभागी असल्याची तक्रार मुरबाड शहर शिवसेना प्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी केली असल्याने त्यांचेवरही कारवाई होणार काय याची चर्चा आता रंगली आहे.

मुरबाड बाजार पेठेतील मुख्यरस्त्याचे रुंदीकरण करताना जुन्या टपऱ्या तोडून तेथे विना परवानगीआर सी सी गाळे तयार करण्यात आले नगर पंचायतीच्या कार्यालया समोर राजरोस बांधकाम चालू असताना नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गप्प बसले होते तर काही नगर सेवक बांधकामाच्या ठिकाणी देखरेख करत होते या बाबत भाजप कार्यकर्ते प्रसाद पोतदार, भास्कर खंडागळे, मुरबाड शहर शिवसेना प्रमुख राम दुधाळे, मनसे अध्यक्ष नरेश देसले, रवींद्र चंदने यांचेसह अनेकांनी तक्रारी उपोषणे करूनही नगर पंचायत प्रशासन गप्प होते एवढेच नव्हे तर या व्यापारी गाळ्यांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरणला नगर पंचायती तर्फे नाहरकत दाखलेही देण्यात आले या प्रकरणाची वरिष्ठ पातळीव चौकशी होऊन त्यामध्ये भुसे दोषी आढळल्याने अखेर मंत्रालयातून त्यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला 

अनधिकृत बांधकामांना तोडण्याची नोटीस
एकीकडे मुख्य रस्त्याची रुंदी कमी करून अनधिकृत गाळ्यांना अभय देताना भुसे शहरातील रस्ता रुंद करण्यासाठी लोकांच्या खाजगी अधिकृत मालमत्ता तोडण्यासाठी कुठलीही नुकसान भरपाई किंवा टी डी आर न देता नागरिकांना त्यांचे घरासमोर जेसीबी व कर्मचाऱ्यांचा ताफा उभा करून दमदाटी होत असल्याने लोकांचा भुसे यांचे वर राग होता काही लोकांनी घाबरून स्वतःहून बांधकामे तोडली तर काही जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे 100 वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या जैन मंदिर व हनुमान मंदिर तोडण्यासाठी सुद्धा त्यांनी नोटीस बजावली होती 1961 पूर्वीचे बांधकाम असलेली प्रार्थना स्थळे तोडू नयेत असा शासनाचा निर्णय असूनही त्यांनी मंदिराचे बांधकाम तोडण्यासाठी नोटीस देऊन कायदा धाब्यावर बसवला होत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT