मुंबई

घर नंबर-506 आणि चॉकलेटी रंगाची पिशवी

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, एक असं शहर ज्या शहरातून दररोज काहीना काही गुन्ह्याच्या बातम्या दररोज समोर येतायत. कधी पित्यानेच आपल्या मुलाचा घोटलेला गळा किंवा पत्नीचा खून केलेला खून तर कधी पत्नीचा खून. अशीच आणखी एक धक्कादायक बातमी पनवेल मधून समोर येताना पाहायला मिळतेय.   

तळोजा घोटकॅम्प येथील नागझरी गावात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱया दाम्पत्याला परिमंडळ-2 मधील अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने अटक केली आहे. अशोक म्हात्रे आणि वत्सला म्हात्रे असे या दाम्पत्याचे नाव असून पोलिसांनी या दोघांजवळ असलेला 3 किलो 600 ग्रॅम वजनाचा सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा गांजा जफ्त केला आहे. 

तळोजा येथील नागझरी गावात रहाणारे दाम्पत्य आपल्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती परिमंडळ-2 मधील अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे व त्यांच्या पथकाने नागझरी गावातील घर नंबर-506 या संशयीत घरावर छापा मारला असता, सदर घरातील दाम्पत्याकडे असलेल्या चॉकलेटी रंगाच्या पिशवीमध्ये 3 किलो 120 ग्रॅम तर पांढऱया रंगाच्या फ्लॅस्टीक पिशवीमध्ये 500 ग्रॅम आंबट व ओलसर व कोरडा गांजा आढळुन आल्याने सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा गांजा जफ्त केला.

त्यानंतर विशेष पथकाने गांजा विक्री करणाऱया दाम्पत्यावर तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. 

WebTitle : panvel couple arrested with 3 kg 600 grams of drugs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर मित्रांसोबत गेलेला तरुण बेपत्ता; हुडी घातलेला संशयित कोण? घातपात की अपघात?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार

Maharashtra Latest News Live Update : नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी! गंगापूर धरण ९४% भरलं, पाण्याची टंचाई संपुष्टात

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली; एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रेयस अय्यरचा पुन्हा भ्रमनिरास! ODI कर्णधारपदाचे केवळ 'गाजर'; BCCI ने स्पष्ट केली भूमिका, इथेही शुभमन गिलला संधी...

SCROLL FOR NEXT