मुंबई

TRP प्रकरणावर रिपब्लिक आणि अन्य वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या समांतर मिडिया ट्रायलला मनाई करावी - राज्य सरकार

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 25 : फेक टीआरपी प्रकरणाबाबत रिपब्लिक टीव्ही आणि अन्य वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या समांतर मिडिया ट्रायलला मनाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र तूर्तास असा दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई पोलिस सध्या फेक टीआरपी प्रकरणाचा तपास करीत आहेत. यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन व्रुत्तवाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी रिपब्लिक टीव्हीच्यावतीने एआरजी आऊटलिअर मिडिया प्रा लिमिटेडने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. न्या. एस एस शिंदे आणि न्या. एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. 

काही वृत्तवाहिन्या या प्रकरणातील साक्षीदार आणि तपासावर भाष्य करीत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे असे करण्यास संबंधितांना मनाई करावी, असे सरकारच्या वतीने एड कपील सिब्बल यांनी सांगितले. तपास अधिकारी यामुळे प्रभावित होऊ शकतात. मात्र तूर्तास असे निर्देश देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर पुढील सुनावणीपर्यंत मनाई आदेश द्यावे अशी मागणी सिब्बल यांनी केली. मात्र गोस्वामी यांच्या वतीने एड आबाद पोंडा यांनी याला विरोध केला. गोस्वामी यांना याची जाणीव आहे, असे ते म्हणाले.

फेक टीआरपी बाबत देशभरात याचिका दाखल असून मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत सुनावणी पूर्ण झाली आहे, असेही पोंडा यांनी सांगितले.

पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. काही कुटुंबांंना पैसे देऊन बोगसपणे टीआरपी वाढविला, अशी तक्रार करण्यात आली आहे. मात्र पोलिस तपासात मानसिक छळ केला जातो, असा आरोपही हंसाकडून करण्यात आला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

parallel media trails fake trp case mumbai police high court state government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT