कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांकडे रुग्णांचा कल; समन्वयाअभावी होतीये फरफट 
मुंबई

कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांकडे रुग्णांचा कल; ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सध्या सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. खासगी प्रयोगशाळांपेक्षा सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचण्या अधिक झाल्या असल्या तरी खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह रिपोर्ट्स 4 टक्क्यांनी अधिक असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 44,8661 इतक्या कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 24,1089 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये तर 20,7572 चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळांमधील 86.93 टक्के म्हणजेच 20,9567 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर खासगी प्रयोगशाळांमधील 82.31 टक्के म्हणजेच 17,0858 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रयोगशाळा मिळून 84.79 टक्के  म्हणजेच 38,0425 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. दोन्ही प्रयोगशाळांमधील 15.21 टक्के म्हणजेच 68,236 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात सरकारी प्रयोगशाळांमधील 13.7 टक्के म्हणजेच 31,522 तर खासगी प्रयोगशाळांमधील 17.69 टक्के म्हणजेच 36,714 चाचण्यांचा समावेश आहे. सरकारी प्रयोगशाळांपेक्षा खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण हे  4.62 टक्क्यांनी अधिक आहे.

खासगी प्रयोगशाळांकडील कल वाढला
राज्यात आतापर्यंत 73 सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात आल्या, तर काही ठराविक 4 खासगी प्रयोगशाळांना चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी अधिक ताण असल्याने अहवाल यायला उशीर होतोय. त्या तुलनेत खासगी प्रयोगशाळांमधील अहवाल काही तासांत येतात. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांमधून चाचणी करून घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे.

समन्वयाअभावी रुग्णांची फरफट
कोरोना चाचणी प्रकरणी दोन्ही प्रयोगशांळांकडून एकमेकांकडे बोट दाखवण्यात येतेय. खासगी डॉक्टर किंवा प्रयोगशांळेतील अहवाल स्वीकारायला सरकारी अधिकारी तयार नसल्याचे काही खासगी डॉक्टरांकडून सांगितले जात आहे, तर एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ही त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना खासगी प्रयोगशांळाचालक देत नसल्याचे काही अधिकारी सांगतात. दोन्ही प्रकरणांत रुग्णांची मात्र फरफट होत असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT