मुंबई

प्लास्टिक प्रदूषण बेततेय, कासवांच्या जिवावर!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वर्सोवा आणि ससून डॉक येथे सापडलेल्या तीन जखमी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना 'रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन' (रॉ) प्राणीप्रेमी संस्थेने वाचवले. ऑलिव्ह रिडले कासवांना समुद्रात वाढणा-या प्लास्टिकचा फटका बसल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, जेणेकरुन समुद्री जीवांचे प्राण वाचतील, असे आवाहन रॉचे संस्थापक पवन शर्मा यांनी केले आहे.

वर्सोवा येथील किनारा स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांना जखमी ऑलिव्ह रिडले कासव सापडले. या कासवाच्या तोंडात हूक अडकलेले त्यांनी पाहिले. ही घटना काल रविवारी घडली. याबाबतची माहिती वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेच्या स्वयंसेवकांनी रॉ संस्थेला दिली. रॉचे संस्थापक अड. पवन शर्मा यांनी या जखमी कासवाला तातडीने संस्थेच्या रुग्णवाहिकेतून वांद्रा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रिना देव यांच्या दवाखान्यात आणले. 33 किलोच्या या  कासवाच्या तोंडात अडकेले हूक दिसत असले तरीही त्याचा धारा शरीरात आतमध्ये जात गुदद्वारातून बाहेर आला होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्याने कासवाच्या शरीरात हूक अद्यापही अडकून आहे. याच आठवड्यात शस्त्रक्रिया करुन कासवाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

या घटनेला चोवीस तास उलटण्याअगोदरच बुधवारी सकाळी पुन्हा ससून डॉकमधील एका मासेमाराच्या जाळ्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव अडकले. तातडीने ऑलिव्ह रिडले कासवाची सुटका करत याबाबतची माहिती मासेमा-याने कांदळवन विभागाला दिली. जखमी कासवाला कांदळवन विभाग आणि रॉच्या सहकार्याने वांद्रे येथील डॉ रिना देव यांच्या क्लिनिकमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. सायंकाळी पुन्हा एक पाय कापलेले ऑलिव्ह रिडले कासव ससून डॉक येथे सापडले.

सायंकाळपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होता. वर्सोवा आणि ससून डॉकमध्ये बुधवारी सकाळी सापडलेल्या कासवांवर कांदळवन विभाग आणि रॉ च्या सहकार्याने प्राथमिक उपचार केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या देखभालीसाठी खास प्लास्टिक टॅँक उभारण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT